कर्जाचे हप्ते पुढे ढकलण्यासाठी शिवधर्म फाऊंडेशन आणि साम्राज्य संघटनेच्या वतीने तहसीलदारांना निवेदन

सचिन आव्हाड,बारामती

कोरोना व्हायरस मुळे नागरिकांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे .अशातच अनेकांची नोकरी गेली आहे तर अनेक कुटुंबातील कर्ते पुरुष कोरोना मुळे मृत्युमुखी पडले आहेत . यामुळे महाराष्ट्रातील नागरिकांचे सर्वच कर्जाचे हप्ते ३१डिसेंबर पर्यंत पुढे ढकलण्यात यावेत यासाठी शिवधर्म फाऊंडेशन आणि साम्राज्य संघटना महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने बारामती तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले . यावेळी सुनील पालवे , कृष्णा क्षिरसागर , सुशांत गोरवे ,सुधीर शिंदे उपस्थित होते .

महाराष्ट्रात राज्यात कोरोनाने थैमान घातला असून अनेक कुटुंबातील कर्ते पुरूष व्यक्ती कोरोना मूळे मृत्यूमुखी पडले आहेत.

तसेच अनेक कंपन्यांच्या प्राँडक्शनची मागणी कमी झाल्यामुळे कामगार कमी केले गेले आहेत .यामुळे नागरिकांना कर्जाचे हप्ते भरणे अशक्य झाले आहेत. त्याचबरोबर व्यवसायासाठी कर्ज घेतलेल्या व्यवसायिकांचा व्यवसाय कोरोना व्हायरसमुळे ठप्प झाला आहे .यामुळे व्यावसायिकांचा सुद्धा उदरनिर्वाह करणे कठीण झाले आहे . अशा या परिस्थितीत कर्जाचे हप्ते भरणे शक्य आहे का ? अशा परिस्थितीत जगावे कि मरावे . आता सरकारने याबाबत लवकरात लवकर निर्णय घ्यावा . नाहीतर लोक कर्जाच्या हप्त्यामुळे आत्महत्या करण्यास भाग पडतील . आणि याला जबाबदार आपले राज्यशासन असेल…

नागरिकांना दिलासा व आधार देण्यासाठी सर्वच कर्जाचे हप्ते ३१डिसेंबर २०२० पर्यंत पुढे ढकलण्यात यावेत अशी विनंती या निवेदनात करण्यात आली आहे . अन्यथा शिवधर्म फाऊंडेशन महाराष्ट्रराज्य व साम्राज्य संघटना महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने आम्ही रस्त्यावर उतरू असा इशारा या निवेदनात देण्यात आला आहे .

Previous articleशिवसेना नेते माजी मंत्री अर्जुनराव खोतकर यांच्या प्रकृतीसाठी महेश जाधव मित्रपरिवाराच्या वतीने अभिषेक
Next articleसमाज प्रबोधन करणाऱ्या लोककलावंतांचे प्रश्न तातडीने व सकारात्मकरित्या सोडविणार – सांस्कृतिक मंत्री अमित देशमुख