कलाशिक्षक सुनील नेटके यांनी व्यंगचित्रातून केली कोरोना जनजागृती

Ad 1

दिनेश पवार,दौंड

गेली 6 ते 7 महिने झाले सर्व व्यवहार ठप्प आहेत आता हळूहळू अनलॉक परिस्थिती निर्माण होत चालली आहे सर्वजण ही परिस्थिती आटोक्यात कधी येईल हे पाहत आहेत,मात्र या परिस्थिती चा सदुपयोग करत आपल्या अंगी असणाऱ्या कलेला वेळ देत कोरोना विषयी जनजागृती करण्याचे काम कला शिक्षक सुनील नेटके यांनी केले आहे, त्यांनी व्यंगचित्रातून कोरोना विषयी जनजागृती केली आहे,

यापूर्वी पथनाट्य, लघुचिञपट,नाटक,माहिती पट यातून जनजागृती केली आहे, आता लॉकडाऊन चा सदुपयोग घेत कोरोना विषयी काळजी घेण्याचा संदेश व्यंगचित्रातून दिला आहे,घराबाहेर पडू नये,मास्क वापरावा,नियमांचे पालन करावे,सोशल डिस्टन्स पाळावा अशी जनजागृती नेटके सरांनी केली आहे.सुनिल नेटके हे सुभाष कुल,डी एड कॉलेज पाटस व मंगेश मेमोरियल स्कूल . दौंड येथे कलाशिक्षक म्हणून कार्यरत आहेत.

भारत देशात नव्हे तर जगभरात कोरोना विषाणू ने थैमान घातले असून आपण त्याच्या विरुद्ध लढत आहोत मात्र काहींना अजूनही याचे गांभीर्य समजले नाही त्यांच्यामध्ये परिवर्तन व्हावे,जनजागृती व्हावी यासाठी त्यांनी व्यंगचित्रतून घरी बसून आपल्या कलेतून सुंदर वास्तववादी व्यंगचित्र रेखाटले आहेत.

आमच्या प्रतिनिधी शी बोलताना ते म्हणाले की, मी एक भारतीय नागरिक असल्या मुळे माझी एक जबाबदारी पार पाडण्यासाठी छंद जोपासत कला क्रीडा नेते अभिनेते या व्यक्तींचे रोज एक चित्र तयार करून लोकांपर्यत पोहचवण्यासाठी साठी प्रयत्न करत आहे . त्या चित्रावर कोरोना पासून बचाव करणारा संदेश पण लिहिला आहे, याचा उपयोग सर्वांना झाला पाहिजे या उद्धेशाने मी एक उपक्रम राबवत आहे .

४० ते ५० चित्रांचा संच्च तयार केला आहे.मी आता पर्यंत पथनाटयातून ,नाटक एकांकिका जनजागृती तून करत असतो. कोणत्या ना कोणत्या जनजागृती करत राहील आणि हे कोरोना चे संकट लवकर जावो हीच प्रार्थना,सुनील नेटके यांच्या या उपक्रमाचे कौतुक परिसरातून केले जात आहे