कालव्यात कारसह पडलेल्या शिक्षक दांपत्यासह तीन चिमुकल्या मुलींचे तरूणांनी वाचवले प्राण

बाबाजी पवळे,राजगुरुनगर (पुणे) – राजगुरुनगर जवळील सातारा स्थळ येथून चासकमानच्या डाव्या कालव्यावर शिक्षक दांपत्य जात असताना लहान मुलगा अचानक समोर आल्याने मुलाला वाचवण्याच्या प्रयत्नात कार कालव्यात पडली, स्थानिक तरुणांनी केलेल्या मदतीमुळे कारमधील तीन चिमुकल्या मुलींसह कारचालक व पत्नीला सुखरूप बाहेर काढण्यात यश आले.

 

मिळालेल्या माहितीनुसार, चासकमानच्या धरणाच्या डाव्या कालव्यावरून दुपारी एकच्या सुमारास गणेश परशुराम मगर (वय,३५, सध्या. रा. राजगुरूनगर) जात असताना समोरून लहान मुलगा अचानक आल्याने मुलाला वाचवण्यासाठी प्रयत्न करत असताना कालव्याला कठडे नसल्याने कार कालव्यात पडली .त्या ठिकाणी तीन ते चार मिनिटात राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष तुषार सातकर,स्वप्नील सातकर,अशोक सातकर ,संदीप सातकर,विशाल सातकर यांच्यासह आठ ते दहा तरुणांनी तातडीने कालव्यात उडी मारून कारमधील तीन चिमुकल्या मुलांसह मगर यांच्या पत्नीला बाहेर काढले. यावेळी “नशीब बलवत्तर म्हणून वाचलो”,  तसेच याठिकाणी कठडे बसवावे अशी भावना गणेश मगर यांनी व्यक्त केली व मदत करणाऱ्या स्थानिक तरुणांचे आभार मानले आहे.

चासकमान धरणाच्या डाव्या कालव्यातून अनेक दिवसांपासुन पाण्याचा विसर्ग सुरु असुन कालवा दुथडी भरुन वाहत आहे. या रस्त्यांचा वापर आजुबाजुच्या गावातील शेतकरी करत असतात. येथील नागरिकांचा रोज जीवघेणा प्रवास सुरु असतो.

Previous articleसंतोष पवार यांना कोरोना योद्धा सन्मान प्राप्त
Next articleपरिस्थितीवर मात करत सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातील कैलास मेधाने या तरूणाने गाठले आपले ध्येय