संतोष पवार यांना कोरोना योद्धा सन्मान प्राप्त

दिनेश पवार, दौंड
देऊळगावं राजे ता.दौंड येथील संतोष भारत पवार यांना पोलीस मित्र संघ महाराष्ट्र राज्य व सदगुरू सेवा संस्था पुणे,आदिवासी विकास संघ महाराष्ट्र राज्य, ज्ञानसंकल्प सामाजिक संस्था महाराष्ट्र राज्य या संस्था च्या वतीने कोरोना योद्धा प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले आहे,
संतोष पवार हे जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे शिक्षक आहेत,त्यांनी कोरोना च्या काळात प्रशासनाने दिलेल्या नियमानुसार स्वस्त धान्य दुकानावर निरीक्षक म्हणून कोरोना ची ड्युटी केली आहे,कोरोना कालावधी विद्यार्थ्यांचा शालेय पोषण आहार घर पोहच करणे,विद्यार्थी व पालक यांच्यामध्ये कोरोना विषयी काळजी घेण्यासाठी जनजागृती करणे,विद्यार्थ्यांनी मास्क वापरावा,सॅनिटायजर, साबण यांचा सतत वापर करावा,सोशल डिस्टन्स पाळणे,विनाकारण घराबाहेर न पडणे,सर्वांनी काळजी घ्यावी यासाठी त्यांनी जनजागृती केली आहे, तसेच ते उत्तम लेखक असून दैनिक सकाळ च्या मुक्तपीठ, गुदगुल्या यासारख्या प्रसिध्द सदरामध्ये त्यांनी लिखाण केले आहे, शिवाय ते एक बाल कथाकार आहेत,पोलीस मित्र संघाचे संस्थापक अध्यक्ष सुरेश वाळेकर,आदिवासी विकास संघ महाराष्ट्र राज्य युवा आघाडीचे प्रदेश उपाध्यक्ष- गणेश गायकवाड ज्ञानसंकल्प सामाजिक संस्थेचे संस्थापक अध्यक्ष सदाशिव रणदिवे यांनी संतोष पवार यांना हा सन्मान दिला आहे,सरांच्या या निवडीबद्दल परिसरातुन अभिनंदन करण्यात येत आहे.
Previous articleराज्यातील १९ दिवंगत पत्रकारांना हवेली तालुका पत्रकार संघाच्या वतीने श्रध्दांजली
Next articleकालव्यात कारसह पडलेल्या शिक्षक दांपत्यासह तीन चिमुकल्या मुलींचे तरूणांनी वाचवले प्राण