परिस्थितीवर मात करत सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातील कैलास मेधाने या तरूणाने गाठले आपले ध्येय

चाकण : इच्छा असेल तर माणूस अनेक अडचणींना सामोरे जाऊन यश मिळवू शकतो हे दाखवून दिले आहे नाशिक येथील गरीब शेतकरी कुटुंबात जन्मलेल्या कैलास मेधाणे यांनी…चांगली नोकरी सोडून स्वतःचा व्यवसाय बंद करून चक्क हिरो बनायला मुंबई गाठणार हा ध्येयवेडा कैलास मेधाणे हा युवक अखेर मराठी चित्रपट क्षेत्रातील एक उत्कृष्ट दिग्दर्शक बनला आहे.

दिग्दर्शक कैलाश मेधाणे यांनी आजपर्यंत चित्रपट सृष्टित अनेक मराठी हिंदी सुपरहीट गाणी दिली आहेत.विशेष म्हणजे कोरोनाच्या काळात त्यांनी दिग्दर्शन केले “जा लढवाया तु मावळ्या” हे गीत अख्या महाराष्ट्रात सुपरहीट झाले आहे.हे गाणे टी सिरीज कंपनीने रिलीज करून अनेक चॅनलवर प्रचंड गाजले आहे. केले होते.तसेच त्यांची कळले नाते खरे, फक्त तु , पंढरीच्या दारी गर्जला मृंदुंग,गण गण गणात बोते, बाप्पा मोरया रे,महादेव पार्वतिचा गणपती, गणनायक सिद्धी विनायक ही गाणी झी कंपनी, गीत सुमीत म्युझीक, कुनाल म्युझीक या कंपन्यांनी रिलीज केले आहेत.9X झकास,संगीत मराठी, मायबोली या सारख्या अनेक टीव्ही चॅनेलला सुपरहीट झाली आहेत.

दिग्दर्शक कैलाश मेधाणे हे मुळचे नाशिकचे त्यांना लहानपणापासूनच चित्रपटाच प्रचंड आकर्षण होते.गरीब शेतकरी कुटुंबात जमलेल्या कैलास यांना शेती करण्यात मन रमत नव्हते शिक्षण पूर्ण करून नोकरी करण्यास सुरुवात केली मात्र तेथेही मन रमेना मग व्यवसाय सुरू केला परंतु चित्रपटाच वेड लागलेल्या या युवकाला मुंबई खुणावत होती.आपण एक दिवस तरी या क्षेत्रात नाव कमवायचे या वेडाने झापटलेल्या या तरुणाने मुंबई गाठले मात्र येथे कोणाचीही ओळख नसल्याने अनेक धक्के खात मेकअपमन सुजित सुरवसे व अभिनेता अमोल पाटील यांच्या ओळखीतून कामे मिळवत यशाचे शिखर पादाक्रांत केले आहे.येणाऱ्या १६ सप्टेंबरला त्यांचे कळले नाते खरे हे गीत झी म्युझिकवर येणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे.

Previous articleकालव्यात कारसह पडलेल्या शिक्षक दांपत्यासह तीन चिमुकल्या मुलींचे तरूणांनी वाचवले प्राण
Next articleमास्क न वापरणाऱ्या मोटर सायकल स्वार व नागरिकांवर नारायणगाव पोलिसांची कारवाई