मास्क न वापरणाऱ्या मोटर सायकल स्वार व नागरिकांवर नारायणगाव पोलिसांची कारवाई

नारायणगाव (किरण वाजगे)

नारायणगाव पोलिसांच्या वतीने आज नारायणगाव बस स्थानक परिसरात व महामार्गावर मास्क न वापरणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली. अशी माहिती सहाय्यक पोलीस निरीक्षक दत्तात्रय गुंड यांनी दिली.

कोरोना विषाणू च्या प्रादुर्भावा मुळे तोंडाला मास्क लावणे बंधनकारक असताना अनेक ग्रामस्थ, दुचाकीस्वार व नागरिक मास्क न लावता विनाकारण फिरत असतात अशा १६७ जणांवर दंडात्मक कारवाई करून ३३ हजार चारशे रुपये दंड नारायणगाव पोलिसांनी वसूल केला.
तसेच बेकायदा वाहन चालवणे व वाहन परवाना नसणाऱ्या १०१ जणांवर कारवाई करून २७ हजार ९०० रुपये दंड वसूल करण्यात आला. आज एकूण २६८ जणांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली असल्याची माहिती सहाय्यक पो निरीक्षक दत्तात्रय गुंड यांनी दिली

Previous articleपरिस्थितीवर मात करत सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातील कैलास मेधाने या तरूणाने गाठले आपले ध्येय
Next articleकोरोनाची चाचणी करण्यासाठी घरी येणाऱ्या आरोग्य सेवक व कर्मचाऱ्यांना नागरिकांनी सहकार्य करण्याचे आमदार दिलीप मोहिते पाटील यांचे आवाहन