खेड पोलिस ठाण्याच्या पोलिस निरिक्षकपदी सतिश गुरव यांची नियुक्ती

राजगुरुनगर; खेड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अरविंद चौधरी यांची कामशेत (ता. मावळ) येथे बदली झाली असून त्यांच्या जागेवर सतिश गुरव यांची नियुक्ती करण्यात आली आहे. गुरव यांनी पदभार स्विकारला असुन त्यांना खेड पोलिस ठाण्याची जबाबदारी मिळाली आहे.

        पोलीस निरीक्षक सतीश गुरव हे मूळचे कोल्हापूर येथील आहेत. सन १९९३ बॅचमधील ते पोलिस अधिकारी आहे. त्यानी गडचिरोली येथे ५ वर्ष नक्षलवादी क्षेत्रात चांगले काम केले आहे. गुरव हे सेवाभावी वृत्तीचे आणि शिस्तप्रिय अधिकारी आहेत. यापुर्वी त्यांनी पोलिस खात्यातील विविध ब्रॅचमध्ये काम केले आहे.तेलगी स्टॅम्प घोटाळा, महाराष्ट्र एटीएस, आर्थिक गुन्हे शाखा अशा विविध ब्रॅचमध्ये आपल्या कामाचा ठसा उमटावला आहे.

दरम्यान गुरव यांनी पदभार स्विकारताच खेड पोलिस ठाणे हद्दीतील गुन्हेगारीचे धाबे दणाणले आहे.शिस्तप्रिय आन्यायला न्याय मिळवून देणारे म्हणून अधिकारी लाभल्याने नागरिकांमध्ये समाधान व्यक्त होत आहे.खेडच्या पुर्व भागातील औद्योगिक क्षेत्रात वाढती गुन्हेगारी,गावठी कट्टे, अवैध धंदे, संघटीत गुन्हेगारी टोळ्यांचा जेरबंद घालण्याचे मोठे आव्हान गुरव यांना पेलावे लागणार आहे. खेड पोलिस ठाण्याच्या हद्दीत शांतता प्रस्थापित राहावी, यासाठी प्रयत्न राहणार असल्याचे पोलिस निरीक्षक सतिश गुरुव यांनी सांगितले.

Previous articleअतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे करण्याच्या आमदार राहुल कुल यांच्या कडुन प्रशासनास सुचना
Next articleअभिनेते कुमार पाटोळे यांच्या उपोषणाला महाकला मंडलाचा पाठिंबा