अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे करण्याच्या आमदार राहुल कुल यांच्या कडुन प्रशासनास सुचना

आवाज जनतेचा आँनलाईन-

दौंड तालुक्यात अतिवृष्टीमुळे झालेल्या शेती पिकांचे आणि मालमत्तेचे नुकसान झाले होतेय . या नुकसानीचे पंचनामे करण्याच्या सूचना आमदार राहुल कुल यांनी महसूल विभाग , कृषी विभाग व वीज वितरण विभागाला दिल्या आहेत .

याबाबत अधिक माहिती अशी कि, मागील आठवड्यात दौंड तालुक्यातील कासुर्डी, जावजीबुवाचीवाडी, डाळिंब, भरतगाव, बोरीभडक, बोरीऐंदी, नांदूर, सहजपूर, खामगाव व परिसरात गारांसह अतिवृष्टी झाली त्यामध्ये शेतकऱ्यांच्या उभ्या पिकाचे प्रामुख्याने ऊस, भाजीपाला आदींचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. अनेक ठिकाणी घर व गोठ्यांवरील पत्रे उडाले, साठवण चाळीतील कांद्याचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले तर अनेक ठिकाणी विद्युत वाहक पोल पडल्याने विद्युत प्रवाह खंडीत झाला आहे.

या नुकसानीचा पंचनामा करण्यासाठी महसूल, कृषी व वीज वितरण विभागाला आवश्यक त्या सूचना आमदार राहुल कुल यांनी केलेल्या आहेत, शासकीय यंत्रणेद्वारे पंचनामे करण्यास सुरुवात झाली असुन नुकसान भरपाईच्या पुढील कार्यवाहीसाठी शेतकरी व नागरिकांनी आपल्या गावातील तलाठी व कृषी अधिकारी यांचेशी संपर्क करून आपले झालेल्या नुकसानीचे पंचमाने करून घ्यावेत अशी विनंती आमदार राहुल कुल यांचे वतीने करण्यात आलेली आहे.

Previous articleमाजी आमदाराचा कारनामा; सुरेश गोरेंकडून राजमुद्रेचा गैरवापर
Next articleखेड पोलिस ठाण्याच्या पोलिस निरिक्षकपदी सतिश गुरव यांची नियुक्ती