बारापाटी कमान शाळेतील अभिनव “दर्शन पायरी”चे प्रजासत्ताक दिनी लोकार्पण

राजगुरूनगर – चास (ता.खेड) येथील जिल्हा परिषदेच्या बारापाटी प्राथमिक शाळेमध्ये आज भारतीय प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून अभिनव दर्शन पायरी शाळेप्रति समर्पित करण्यात आली. प्रजासत्ताक दिनानिमित्त शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष नवनाथ नाईकरे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.

या शाळेतील शिक्षकांच्या संकल्पनेतून गेली चार वर्षे विद्यार्थी शिक्षक व ग्रामस्थ शाळेमध्ये प्रवेश करण्याआधी शाळेच्या पहिल्या पायरीचे प्रथम दर्शन घेतात व मगच शाळेत प्रवेश करतात.शाळा हे ज्ञानाचे मंदिर आहे आणि विद्यार्थी हेच त्या मंदिरात विराजमान होणारे दैवत आहे या सुंदर सुवचनाची प्रचिती देणारी उपक्रमशील शाळा म्हणून बारापाटी शाळेची नव्याने ओळख निर्माण करून देण्यात संजय नाईकरे व वैशाली मुके – नाईकरे हे शिक्षक दांपत्य यशस्वी ठरले आहे.गेल्या चार वर्षांपासून या शाळेत ही अभिनव संकल्पना राबविण्यात येत असून चार वर्षांपूर्वी या शाळेत आलेल्या या दोन्ही शिक्षकांनी आपल्या अथक परिश्रमाने बारापाटी शाळेचा अंतर्बाह्य कायापालट घडवून आणला आहे.

या शाळेतील विद्यार्थ्यांना दरवर्षी आदर्श विद्यार्थी व आदर्श विद्यार्थिनी पुरस्कार देण्यात येतात.याकरिता विद्यार्थ्यांना शैक्षणिक गुणवत्ता,सदाचरण, नियमितता, आज्ञाधारकता, आणि विविध स्पर्धा व परीक्षांमध्ये प्राप्त केलेले मानांकन असे निकष लावले जातात.

यावर्षी आराध्या राम नाईकरे आणि हर्ष बाळासाहेब नाईकरे या दोन विद्यार्थ्यांना हा “स्टुडंट्स ऑफ द ईयर” चा बहुमान मिळाला आहे.बारापाटी शाळेच्या प्रांगणात संपन्न झालेल्या सांस्कृतिक समारंभात शाळेतील गुणवंत विद्यार्थ्यांना पारितोषिके प्रदान करण्यात आली.त्यानंतर विद्यार्थ्यांनी रंगतदार सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले.उपस्थित ग्रामस्थ व पालकांनी देखील बक्षीसांची खैरात करीत तब्बल पाच हजार रुपयांहून अधिक रकमेची बक्षिसे विद्यार्थ्यांना दिली.

याप्रसंगी कमान गावचे सरपंच योगेश नाईकरे, कमान केंद्राचे केंद्र प्रमुख एकनाथ लांघी,मा.उपसरपंच मोनिकाताई नाईकरे, ग्रामपंचायत सदस्य मच्छिंद्र रोकडे,अश्विनी नाईकरे,अमोल नाईकरे,शाळा व्यवस्थापन समितीचे सर्व सदस्य, उद्योजक मारुती नाईकरे,भास्कर नाईकरे,अविनाश नाईकरे, शिवाजी नाईकरे जेष्ठ नागरिक,शिवसाम्राज्य प्रतिष्ठानचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते,संपत नाईकरे,योगेश नाईकरे, प्रवीण नाईकरे,सतिश नाईकरे, देवेंद्र नाईकरे,सोमनाथ सपाट,गोविंद रोकडे,सुदाम सपाट,दत्ता नाईकरे, सुरेश नाईकरे फौजी,संगिता नाईकरे, सुषमा नाईकरे,अस्मिता नाईकरे,प्रकाश सपाट, परशुराम सपाट,आणि महिला भगिनी व माजी विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.कार्यक्रमाचे संयोजन व सूत्रसंचालन मुख्याध्यापक संजय नाईकरे यांनी केले तर सहशिक्षिका
वैशाली मुके यांनी आभार मानले.

काय आहे दर्शन पायरी ?

खरंतर शाळा ही मंदिरांइतकीच पवित्र वास्तू असते.किंबहुना मंदिरांमध्ये जाताना आपण जसे पादत्राणे व वाईट विचार बाहेर ठेवून आत प्रवेश करतो तसाच मूलविचार या संकल्पनेच्या मुळाशी आहे.शाळेत प्रवेश करण्यापूर्वी दररोजच्या दिवसासाठी मिळणाऱ्या ज्ञान व अनुभवांकरिता शाळेप्रती आदर व्यक्त करावा.यामुळे विद्यार्थ्यांना नम्रता व कृतज्ञता यांचा नित्य परिचय होतो.आधीची अरुंद पायरी मोठी करत व संपूर्ण काम शिक्षकांनी स्वतः पूर्ण करीत या पायरीचे निर्माण केले आहे.ही पायरी पाहून आमची मुले खूप आनंदी झाली आहेत -संजय नाईकरे मुख्याध्यापक

Previous articleवाफगाव येथील ऐतिहासिक बारवची स्वच्छता
Next articleआखरवाडीतील युवकांनी पुन्हा राखले समाजभान