वाफगाव येथील ऐतिहासिक बारवची स्वच्छता

राजगुरूनगर – वाफगाव येथील भुईकोट किल्ल्यामधील ऐतिहासिक बारव परिसराची युवक- युवतींनी उन्हातान्हाची तमा न बाळगता स्वच्छता केल्याने बारव परिसराने मोकळा श्‍वास घेतला. तरुणांच्या या उपक्रमाचे सर्व सर्वस्तरातून कौतुक होत आहे.

या बारवेची स्वच्छता करायचा निर्णय घेऊन काही माय सह्याद्री परिवार व बजरंग दल यांनी पुढाकार घेऊन आवाहन केले. त्या आवाहनास प्रतिसाद देत संग्राम फड ,प्रशांत कोळेकर,बाबू भरडे,गायत्री जाधव,ज्ञानेश्वरी भुजबळ यांच्यासह महाविद्यालयीन युवक – युवतीच्या मदतीने उन्हातान्हाची तमा न बाळगता केवळ चार-पाच तासातच परिसराची साफ स्वच्छता केली.

यावेळी आरटीआय कार्यकर्ते बाबाजी पवळे,चाकण फॉरेस्ट रेस्क्यू टीम आणि आपत्ती निवारण टीमचे सदस् शांताराम गाडे पाटील, प्रशांत अष्टेकर आणि मार्गदर्शन योग गुरू बापूसाहेब सोनवणे सर यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.

कित्येक वर्षाने बारव परिसराने मोकळा श्‍वास घेतल्याचा आनंद युवकांच्या चेहर्‍यावर स्पष्ट दिसत होता. या कामाबद्दल सर्व युवकांचे माय सहयाद्री परिवाराचे अध्यक्ष महेश भुजबळ यांनी कौतुक करून शाबासकी दिली व आभारही मानले.

ऐतिहासिक बारव असलेला पुरातन वारसा जतन करणे काळाची गरज आहे. येथील बारव होळकर कालीन असून तिला अनन्यसाधारण महत्त्व आहे.

या ऐतिहासिक ठेव्याचे महत्त्व पुढील पिढीला कळावे व येथील पाण्याचा उपयोग व्हावा यासाठी तरुणांच्या सहकार्याने त्याची कायमस्वरूपी देखभाल ठेवण्याचा प्रयत्न राहील.-महेश भुजबळ (माय सहयाद्री परिवार)

Previous articleव्यसनमुक्ती केंद्र आई बाबा फाउंडेशन तर्फे गौरव स्त्री प्रतिभा पुरस्कार सोहळा संपन्न
Next articleबारापाटी कमान शाळेतील अभिनव “दर्शन पायरी”चे प्रजासत्ताक दिनी लोकार्पण