आखरवाडीतील युवकांनी पुन्हा राखले समाजभान

(वृत्त विशेष)
राजगुरूनगर – चास (ता-खेड) येथीलआखरवाडी गावातील आदर्श युवाशक्तीने पुन्हा एकदा समाजासमोर आदर्शवत ठरावी अशी कामगिरी करत आपले समाजभान जपले आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की शनिवारी रात्री साडेआठ च्या सुमारास आखरवाडी गावाच्या हद्दीत स्प्लेंडर गाडीवर राजगुरुनगर च्या दिशेने जाणारा एक अनोळखी युवक पुढून येणाऱ्या गाडीच्या प्रखर प्रकाशाने डोळे दिपल्यामुळे रस्त्याच्या कडेला असलेल्या खडड्यात पडला.या रस्त्यावर आजुबाजुला वाढलेली झुडपे मोठ्या प्रमाणावर आहेत.या झुडूपांमध्ये त्याची गाडी व तो गाडीसह वेगात घुसून अडकून पडलेल्या अवस्थेत तो या आखरवाडीतील काही युवकांच्या निदर्शनास आला.

या विद्यार्थ्यांना ज्ञानदान केलेले व सध्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळा बारापाटी येथे मुख्याध्यापक म्हणून कार्यरत असलेले प्राथमिक शिक्षक संजय नाईकरे या रस्त्याने जात असताना त्यांनाही ही गोष्ट समजली.त्यांनी ही तेथे थांबून अपघातग्रस्त युवकाला अडचणीतून बाहेर काढून पुढे मार्गस्थ केले.गावातून तात्काळ कु-हाड मागवून त्यांनी तशा अंधारात देखील मोबाईलच्या उजेडात रस्त्यावर आलेल्या मोठमोठ्या फांद्या तोडून बाजूला नेऊन टाकल्या.सुमारे पाऊण तास अंधारात या युवकांनी केलेल्या कामाचे रस्त्यावरुन ये-जा करणा-या वाहनचालकांनी देखील कौतुक केले.तेथे थांबून ‌आपल्या गुणवंत विद्यार्थ्यांचे सोबत रात्री अपरात्री देखील समाजभान जपणा-या शिक्षक संजय नाईकरे यांचेही समाजाच्या सर्व स्तरातील लोकांनी अभिनंदन केले आहे.

Previous articleबारापाटी कमान शाळेतील अभिनव “दर्शन पायरी”चे प्रजासत्ताक दिनी लोकार्पण
Next articleकेंद्रातील मोदी सरकारने अपंगांच्या विविध रखडलेल्या मागण्या पूर्ण न केल्यास दिल्लीतील संसद भवनावर अपंगांचा मोर्चा काढू : खासदार सुप्रियाताई सुळे