एक गाव एक गणपती दावडी ग्रामस्थांचा संकल्प

राजगुरुनगर– दावडी गाव हे खेड तालुक्यातील पूर्व भागातील मोठं गाव आहे,बारा हजार लोकसंख्या चे गाव आहे, दावडी गाव हे वाडया,वस्त्या मध्ये विखुरलेल्या गाव आहे, गणेश उत्सवाच्या अनुषघाणे सध्या देशभरात करोना विषाणू रोगाने नागरिक त्रस्त आहेत व खेड तालुक्यात करोना रुग्ण जास्त आढळून आले आहे.त्यामुळे खेड पोलीस पोलीस स्टेशनचा सूचनेनुसार एक गाव एक गणपती या संकल्प च्या आदेशाचें पालन करून व शासकीय आदेशाचे पालन करून दावडी गावचे ग्रामस्थांनी एकत्र येऊन एक गाव एक गणपती करण्याचा निर्धार केला आहे.दावडी गावात एकूण 32 मंडळ आहे,यावेळी श्री महालक्ष्मी मंदिरात बैठक आयोजन करण्यात आली होती.

यावेळी खेड उपविभागीय अधिकारी गजानन टोम्पे साहेब,खेड पोलीस स्टेशनचे ,पोलिस निरीक्षक सतीश गुरव साहेब यांच्या प्राप्त आदेशानुसार ,पोलीस हवालदार संतोष मोरे,संजय रेपाळे साहेब,दावडी गावचे पोलीस पाटील आत्माराम डुंबरे, मा सरपंच संतोष गव्हाणे, मा उपसरपंच भाऊसाहेब होरे यांच्या मार्गदर्शनाखाली बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.यावेळी पोलीस
संतोष मोरे,संतोष गव्हाणे, भाऊसाहेब होरे यांनी मनोगत वक्त केले.

यावेळी उपस्थित हिरामण खेसे, विलास गावडे ,अमोल ओव्हाळ, संतोष सातपुते, हारून शेख,संतोष सातपुते, पांडुरंग दुडे, संतोष लोणकर, रोहिदास कान्हूरकर,शंकर बोत्रे,व दावडी गावचे ग्रामस्थ, गणपती मंडळच्या अध्यक्ष ,कार्यकर्ते उपस्थित होते.

यावेळी ही बैठक यशस्वी रित्या पार पडली म्हूणन दावडी विभागाचे बिट अंमलदार पोलीस हवालदार संतोष मोरे साहेब,संजय रेपाळे साहेब, यांचा सन्मान दावडी गावचे पोलीस पाटील आत्माराम डुंबरे यांच्या हस्ते सन्माम करण्यात आला

Previous articleवाढदिवसाचा अनाठायी खर्च टाळून विशाल पवार यांनी महाळुंगे कोविड सेंटर केली मदत
Next articleजुन्नर तालुक्यात आज अखेर 698 पॉझिटिव्ह रुग्ण