जुन्नर तालुक्यात आज अखेर 698 पॉझिटिव्ह रुग्ण

नारायणगाव (किरण वाजगे)

नारायणगाव परिसरामध्ये आज 12 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले असून जुन्नर तालुक्यामध्ये आज एकूण तब्बल 38 कोरोणा पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत . अशी माहिती आरोग्य अधिकारी डॉ वर्षा गुंजाळ यांनी दिली.

आज अखेर तालुक्यांमध्ये 698 कोरोणा पॉझिटिव्ह रुग्ण झाले आहेत.
यामुळे जुन्नर तालुक्यांमध्ये निश्चितपणे चिंतेचे वातावरण पसरले आहे. लवकरच गणेशोत्सवाची सुरुवात होणार आहे. त्यामुळे गणेशोत्सवाची तयारी करण्यासाठी अनेक नागरिक वेगवेगळ्या दुकानांमध्ये गर्दी करताना दिसत आहेत. सर्व नागरिकांनी कोरोना वाढीच्या पार्श्वभूमीवर सोशल डिस्टंसिंग चे पालन करणे गरजेचे असून योग्य कारणासाठीच घराबाहेर पडावे असे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.

आज नारायणगाव मध्ये आठ कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले असून जुन्नर मध्ये सहा, येणेरे एक, काळवाडी एक, येडगाव एक, निरगुडे एक, उंब्रज एक, रोहकडी एक, शिंगवे एक, ओतुर तिन, शिरोली तीन, पिंपरी पेंढार दोन, आळेफाटा, येडगाव, वारूळवाडी , आळे येथे प्रत्येकी एक असे एकूण आज 38 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण निष्पन्न झाले आहेत.

विशेष म्हणजे गेल्या तीन दिवसात सुमारे शंभर कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण जुन्नर तालुक्यात सापडल्यामुळे चिंता व्यक्त करण्यात येत आहे. तालुक्यात आज पर्यंत 698 पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या झाली आहे. यातील 501 रुग्ण बरे होऊन घरी केले आहेत तर 136 एवढे रुग्ण उपचार घेत आहेत. एकूण 31 रुग्णांचा कोरोणा मुळे मृत्यू झाला आहे. अशी माहिती तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ उदय गोडे व वैद्यकीय अधिकारी डॉ वर्षा गुंजाळ यांनी दिली.

Previous articleएक गाव एक गणपती दावडी ग्रामस्थांचा संकल्प
Next articleसामाजिक दुरदृष्टीतुन शिंदवणे गावाचा सर्वागीण विकास – ऋषीकेश पवार