वाढदिवसाचा अनाठायी खर्च टाळून विशाल पवार यांनी महाळुंगे कोविड सेंटर केली मदत

चाकण-कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर जगासह तालुक्यातही कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता जिल्हा परिषदेच्या वतीने महाळुंगे येथे कोविड सेंटर उभारण्यात आलेल्या म्हाडाच्या इमारतीमध्ये स्वॅब देण्यासाठी आलेल्या रुग्णांचे ऊन-पावसापासून संरक्षण होण्यासाठी छत पाहिजे असे आव्हान ग्राम विकास अधिकारी सोमनाथ पारासुर यांनी केले होते त्यादृष्टीने समाजाच्याप्रति आपले काही देणे लागते या उद्देशाने महाळुंगे गावातील युवा उद्योजक शिवसेना शाखाप्रमुख विशालभाऊ पवार यांनी आपला वाढदिवसाचा अनाठाई खर्च टाळून छतासाठी ताडपत्री आज दिली.

यावेळी वैद्यकिय अधिकारी जितेंद्र वुनवणे, सुरेश गोरे,अपेक्षा बोरकर,युवा उद्योजक राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे खजिनदार लीलाधर तुपे जय हिंद मित्र मंडळाचे अध्यक्ष अतुलभाऊ जावळे, युवा कार्यकर्ते सम्राटभाऊ तुपे उपस्थित होते.

या ताडपत्री च्या छोट्या मदतीने संबंधित प्रशासनाच्या अधिकाऱ्यांकडून विशाल भाऊ यांचे कौतुक होत आहे सोमनाथ पारासुर म्हणाले विशालभाऊ यांचे कार्य प्रेरणादायी आहे त्यांनी केलेला उपक्रम अतिशय छान व सेवाभावीवृत्तीने राबविला आहे.

Previous articleश्री नवनाथ तरुण मिञ मंडळ आयोजीत आरोग्य उत्सवाची तयारी अंतिम टप्प्यात
Next articleएक गाव एक गणपती दावडी ग्रामस्थांचा संकल्प