कनेरसर येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील मुलांना स्पोर्ट्स ड्रेसचे वाटप

राजगगुरूनगर- पुणे जिल्हा परिषद(शिक्षण) विभागाच्या वतीने वतीने दिवाळीच्या सुट्टी नंतर कला, क्रिडा, महोत्सवाचे केंद्र,बीट, तालुका, जिल्हा पातळीवरील स्पर्धाचे आयोजन करण्यात येणार आहे. तरी क्रिडा स्पर्धेसाठी सराव करण्यासाठी स्पोर्ट्स ड्रेस ची गरज होती. ती गरज ओळखून कनेरसर गावचे युवा उद्योजक  संतोषशेठ रामदास दौंडकर यांनी शाळेतील ९४ विद्यार्थ्यांना उत्तम क्वालीटीचे स्पोर्ट्स ड्रेस दिले. या स्पोर्ट्स ड्रेस चे वाटप खेड पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी  जीवन कोकणे  यांच्या हस्ते वाटप करण्यात आले.

तसेच कनेरसर गावचे भुमीपूत्र, आमचा अभिमान, स्वाभिमान विध्याधाम माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय कान्हूर मेसाई चे शिक्षक श्री. अविनाशजी रामचंद्र दौंडकर सर यांचा कनेरसर केंद्रप्रमुख व केंद्रातील सर्व शिक्षक वृंद, महाराष्ट्र राज्य पदवीधर प्राथमिक शिक्षक व केंद्रप्रमुख सभा पुणे खेड शाखा यांच्या वतीने आदर्श शिक्षक पुरस्कार खेड तालुक्या चे गटशिक्षणाधिकारी आदरणीय श्री.जीवनजी कोकणे साहेब यांया हस्ते प्रदान करण्यात आला. तसेच अंबिका विद्यालय कनेरसर येथील शिक्षिका श्रीम पूजा बोरकर मॅडम विद्यार्थीनी अंकिता दौंडकर विज्ञान प्रदर्शनात जिल्हा पातळीवर शाळेचा द्वितीय क्रमांक आल्याबद्दल सन्मान करण्यात आला. यावेळी शिवव्याख्याते आदरणीय श्री संपतराव गारगोटे सर यांचे शिवाजी महाराजांचे जीवन कार्य या विषयी व्याख्यान आयोजित करण्यात आले होते.

यावेळी खेड पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी आदरणीय श्री.जीवनजी कोकणे, विषयतज्ञ श्री. दयानंदजी शिदे सर,केंद्रप्रमुख मा.श्री.बाळासाहेब गावडे, कनेरसर सरपंच सौ. सुनिताताई केदारी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्री. बाळासाहेब दौंडकर, उपाध्यक्षा सौ.प्रिया हजारे,सदस्य श्री.चंद्रकांत दौंडकर, सागर म्हसुडगे,ग्रामस्थ गणेश माशेरे,श्री अविनाश दौंडकर सामाजिक कार्यकर्ते श्री. चांगदेव झोडगे,सौ. अस्मिता माशेरे, सौ.द्वारका सोनवणे, जालिंदरनगर शाळेचे आदर्श शिक्षक श्री. दत्तात्रय वारे सर, श्री. संदिप म्हसुडगे, हजारेवस्ती शाळेचे गुलाब हजारे, कनेरसर शाळेचे मुख्याध्यापक श्री.नानाभाऊ गावडे, श्रीम. अंजली शितोळे, श्रीम.सारिका राक्षे, श्रीम. शुभांगी जाधव मॅडम,श्री. संतोषशेठ रामदास दौंडकर यांच्या वतीने प्रतिनिधी,गणेश एन्टरप्रायजेस चे जुबेर इनामदार व सहकारी उपस्थित होते.

सामाजिक कार्यकर्ते श्री. चांगदेव झोडगे,श्री. अविनाश दौंडकर सर यांच्या वतीने मुलांना खाऊचे वाटप करण्यात आले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कनेरसर शाळेच्या उपक्रमशील शिक्षिका श्रीम सारिका राक्षे मॅडम यांनी केले. आभार श्री गुलाबराव हजारे यांनी मानले.

या कार्यक्रमाचे आयोजन,नियोजन पुणे जिल्हा पदवीधर प्राथमिक शिक्षक व केंद्रप्रमुख सभेचे जिल्हाउपाध्यक्ष श्री. संदिपराव म्हसुडगे सर यांनी केले.

Previous articleमारुती कांबळे यांची रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले गट) हवेली तालुक्याच्या अध्यक्षपदी फेरनिवड
Next articleवीज ऊद्योगातील कंत्राटी कामगारांचे प्रलंबित मागण्यासाठी महाराष्ट्रात २२ डिसेंबरला करणार आंदोलन