मारुती कांबळे यांची रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले गट) हवेली तालुक्याच्या अध्यक्षपदी फेरनिवड

उरुळी कांचन

थेऊर (ता. हवेली) येथील मारुती दादा कांबळे यांची रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले गट) हवेली तालुक्याच्या अध्यक्षपदी फेरनिवड करण्यात आली आहे. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष सुर्यकांत वाघमारे व महाराष्ट्र राज्य महिला आघाडी अध्यक्षा चंद्रकाताताई सोनकांबळे यांच्या हस्ते निवडीचे पत्र देण्यात आले आहे.

लोणी काळभोर (ता. हवेली) याठिकाणी नवनिर्वाचित पदाधिकारी सत्कार सोहळा व हवेली तालुका कार्यकारणीची निवड करण्यात आली. यावेळी हे पत्र मारुती कांबळे यांना देण्यात आले.

यावेळी पुणे शहराध्यक्ष शैलेंद्र चव्हाण, कार्याध्यक्ष विक्रम शेलार, पंकज दादा धिवार, अरुणा हरपळे, युवकाध्यक्ष प्रविण ओव्हाळ उपस्थित होते.

तर कार्यक्रमाचे आयोजन मारूती दादा कांबळे, बाबा मोरे, बापूसाहेब गायकवाड, विशाल शेलार , लोणी काळभोर ग्रा. सदस्य गणेश कांबळे, दिपक आडागळे, नवनाथ कांबळे , शकिल शेख, अभिजित पाचकुडे, कार्यक्रमाला प्रमुख उपस्थित होते.

Previous articleकंत्राटी कामगारांच्या प्रश्नांच्या बाबतीत भारतीय मजदूर संघ रस्तावर उतरणार : अखिल भारतीय मजदूर संघांची घोषणा
Next articleकनेरसर येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील मुलांना स्पोर्ट्स ड्रेसचे वाटप