कंत्राटी कामगारांच्या प्रश्नांच्या बाबतीत भारतीय मजदूर संघ रस्तावर उतरणार : अखिल भारतीय मजदूर संघांची घोषणा

कुरकुंभ , सुरेश बागल

भारतीय मजदूर संघ ही राष्ट्रभक्त कामगारांची संघटना असुन कामगारांवर होणाऱ्या अन्याया विरोधात रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलनात्मक संघर्ष करण्याचा ईशारा महाराष्ट्र वीज कंत्राटी कामगार संघ (संलग्न भारतीय मजदूर संघ) त्रैवार्षीक अधिवेशन रेशीमबाग नागपूर येथे चालू असलेल्या उद्घाटन सत्रात दिला आहे. या उद्घाटन सत्रात स्वागत अध्यक्ष दत्ता धामणकर, महाराष्ट्र वीज कंत्राटी कामगार संघांचे अध्यक्ष निलेश खरात, महामंत्री सचिन मेंगाळे, जेष्ठ मार्गदर्शक अण्णा देसाई, कामगार महासंघाचे अध्यक्ष विठ्ठल भालेराव, महामंत्री अरूण पिवळ, संविदा मजदूर संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष दिनेश वसिष्ठ,भा.म संघाचे क्षेत्रीय संघटन मंत्री सी व्ही राजेश, भा.म संघाचे महाराष्ट्र राज्य अध्यक्ष अनिल ढुमणे, भा.म संघाचे विदर्भ महामंत्री गजानन गटलेवार ईतर मान्यवर उपस्थित होते.

भारतीय मजदूर संघ ही जगातील एक नंबरची संघटना असुन ४ कोटींचे पेक्षा जास्त सभासद असुन भारतीय मजदूर संघ ही संघटना स्थापना झाली तेंव्हा असलेल्या विविध संघटना या राजकीय पक्षाच्या होत्या. राजकीय पक्षांच्या संघटना कामगारांचे भले करू शकत नाही, तेव्हा भारतीय मजदूर संघ राष्ट्रीयहित, ऊद्योगहित, व कामगारहित हेच धोरण घेवून देशभरातील शोषित, पिडीत कामगारांना न्याय मिळवून देण्यासाठी सतत सहकार्यात्मक सहकार्य या पद्धतीने काम करीत असुन सरकारने योग्य प्रतिसाद न दिल्यास भारतीय मजदूर संघ संघर्षशील भुमिका येईल अशी भुमिका अखिल भारतीय मजदूर संघ संघाचे महामंत्री मा श्री रविंद्र हिंमते यांनी मांडली आहे. ६० वर्षांत पर्यंत कंत्राटी कामगारांना रोजगार व रोजगारात सुरक्षा, वेतन सुरक्षा, कंत्राटदार बदलला तरी कामगार तेच राहीले पाहिजे, कामगारांना सेवेत कायम करावे सरकार कोणतेही असो पण कामगारांना न्याय मिळवून देण्यासाठी दि २१ डिसेंबर २०२२ मुंबई येथे व २८ डिसेंबर २०२२ रोजी नागपूर येथे भव्य मोर्चात सहभागी व्हावे असे आवाहन केले आहे.

या अधिवेशनामध्ये महाराष्ट्राचे राज्यपाल मा भगतसिंह कोश्यारी, उप मुख्यमंत्री व उर्जा मंत्री मा देवेंद्र फडणवीस, माजी आमदार सौ मेधा कुलकर्णी यांनी व्हीडीओ संदेशा व्दारे मनोगत व्यक्त केले आहे. तर कामगार मंत्री मा. ना. सुरेशजी खाडे व माजी ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी पत्रा द्वारे हार्दिक शुभेच्छा दिल्या.

अधिवेशनामध्ये विविध सत्रात भारतीय मजदूर संघांचे विदर्भ महामंत्री गजानन गटलेवार, महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष श्री अनिल ढुमणे, यांनी मार्गदर्शन केले आहे.

या अधिवेशनामध्ये महाराष्ट्र राज्यातील विज ऊद्योगातील ३६ जिल्हा मधील प्रमुख पदाधिकारी तसेच हरियाणा, राजस्थान, उत्तर प्रदेश, छस्तीसगढ मधील पदाधिकारी उपस्थित होते.
या सत्राचे सुत्रसंचालन सागर पवार यांनी केले आहे.

Previous articleपैगंबर जयंतीनिमित्त आरोग्य शिबिरासह विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन
Next articleमारुती कांबळे यांची रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले गट) हवेली तालुक्याच्या अध्यक्षपदी फेरनिवड