दावडी येथे शॉर्ट सर्किट मुळे लागल्याने आगीत घर जळून खाक

राजगुरुनगर– दावडी येथील गावडेवस्ती येथे एकनाथ पंढरीनाथ गावडे यांच्या घराला शॉर्ट सर्किट मूळे आग लागली, ही आग बारा वाजता लागली,त्यामुळं संपूर्ण घर जाळून खाक झाले आहे,ही बातमी समजताच घर मालकांनी दावडी चें पोलीस पाटिल आत्माराम डुंबरे यांना कळवली, व घटनास्थळी दाखल होताच अग्निशामक दलाची पोलीस पाटलांनी बोलावली, व अग्निशामक दल चें कर्मचारी, पोलीस पाटील आत्माराम डुंबरे, व ग्रामस्थांच्या मदतीने आग विजवली,यावेळी घराचे मोठ्या पूर्ण नुकसान झाले आहे,यामध्ये चाळीस हजार रुपयांची रोकड जळून खाक झाले,3 तोळे चे सोने, फ्रीज,LEDटी वी,फॅन,कपाट, कपडे,बाजरी गहू, चे पोती, घराचे वासे,घराचे दरवाजे,जळून खाक झाले,या घराचे अंदाचे चार ते पाच लाखाचे नुकसान झाले आहे.

यामध्ये जीवित हानी झाली नाही या घरामध्ये दोन सिलेंडर गॅस च्या टाकी होत्या घर जळत असताना या सिलेंडर गॅस च्या टाक्या पोलीस पाटील आत्माराम डुंबरे ग्रामस्थ व यांनी जीव धोक्यात घालून बाहेर काढल्या मुळे मोठा अनर्थ टळला. यावेळी अग्निशामक दल,ग्रामस्थांनी मदत केली.याचा घराचा पंचनामा दावडी चे पोलीस पाटील आत्माराम डुंबरे,तलाठी सतीश शेळके, कोतवाल देवा ओव्हाळ, यांनी केला आहे.हा पंचनामा खेड तहसील ला नेऊन देणार आहे, या कुटुंबला कशी मदत देता येईल याचा प्रयत्न करण्यात येईल असे तलाठी यांनी सांगितले.

यावेळी उपस्थित ग्रामस्थ रामदास बोत्रे, संभाजी आबा घारे, देवराम सातपुते,रमेश होरे, अशोक सातपुते, बाबासाहेब डुंबरे, बाळासाहेब गावडे, संदेश गावडे, सुरेश होरे, शिवाजी कान्हूरकर, ऋषिकेश घाडगे, उपस्थित होते.

घराची ही आग मोठ्या प्रमाणात होती,घरात दोन सिलेंडर गॅस च्या टाक्या होत्याया मी आणि ग्रामस्थांनी जीव धोक्यात काडून ह्या टाक्या बाहेर काडून मोठा अनर्थ टाळला,व या कुटुंब ला जास्तीज जास्त मदत कशी होईल याचा प्रयत्न करणार असल्याचे पोलीस पाटील आत्माराम डुंबरे यांनी सांगितले

Previous articleसोशल डिस्टंसिंगच्या नियमांचे पालन करून टेमगिरेवाडी येथे स्वातंत्र्य दिन साजरा
Next articleवडगाव काशिंबेग गावच्या हद्दीत घोड नदी पात्रातून वाळू उपसा करणाऱ्या चार वाळू माफियांना मंचर पोलिसांनी ठोकल्या बेड्या