सोशल डिस्टंसिंगच्या नियमांचे पालन करून टेमगिरेवाडी येथे स्वातंत्र्य दिन साजरा

चाकण– कोरोना च्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने दिलेल्या सर्व नियमांचे पालन करून टेमगिरेवाडी येथे स्वातंत्र्य दिन साजरा करण्यात आला टेमगिरेवाडी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेमध्ये शालेय समितीच्या व्यवस्थापक तसेच काळुस गावच्या माजी उपसरपंच विद्यमान सदस्य रूपाली संतोष खैरे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आला यावेळी मोजक्या लोकांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम उत्साहात पार पाडण्यात आला.

यावेळी रूपाली खैरे म्हणाले प्रथमच विद्यार्थ्यां शिवाय स्वातंत्र्य दिन साजरा होत आहे त्याची मोठी खंत वाटत आहे परंतु कोरणा या महामारीला हरवण्यासाठी प्रशासनाने दिलेल्या नियमांचे काटेकोरपणे पालन करून सर्वांनी कोरोनाला हरवायचा आहे

गावातील सर्व नागरिकांना सोशल मीडियाद्वारे स्वातंत्र्य दिनाच्या कार्यक्रमाचे फोटो पाठवण्यात आले आहे तसेच नागरिकांनी सोशल डिस्टंसिंग वेळोवेळी हात धुवावे, मास्क व सॅनिटायझर वापर करावा असा संदेश दिला या कार्यक्रमाला शाळेतील शिक्षक वाटेकर सर शालेय समितीच्या व्यवस्थापक योगिता खैरे, माजी उपसरपंच विद्यमान सदस्य रूपाली खैरे उपस्थित होते

Previous articleकार्तिकी पठारे या चिमुकलीने डिजिटल पद्धतीने स्वातंत्र्य दिन साजरा करून ठेवला वेगळा आदर्श
Next articleदावडी येथे शॉर्ट सर्किट मुळे लागल्याने आगीत घर जळून खाक