वडगाव काशिंबेग गावच्या हद्दीत घोड नदी पात्रातून वाळू उपसा करणाऱ्या चार वाळू माफियांना मंचर पोलिसांनी ठोकल्या बेड्या

Ad 1

प्रमोद दांगट प्रतिनिधी : आंबेगाव तालुक्यातील वडगाव काशिंबेग गावच्या हद्दीत घोड नदी पात्रातून दोन लाख सहा हजार दोनशे पन्नास रुपये किमतीची वाळू चोरून नेल्याप्रकरणी पंचनामा करून अज्ञात वाळू चोरट्यांन विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता या बाबत मंडलाधिकारि योगेश पाडळे यांनी फिर्याद दाखल केली होती . त्यानुसार पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवली असता या  चार वाळू माफियांना मंचर पोलिसांनी अटक केली आहे.

अमर बाळासाहेब शेवाळे (वय २३ रा. लांडेवाडी ता. आंबेगाव), आकाश सत्यवान शेटे (वय २८), तुषार शांताराम टेके (वय २३) सचिन रामदास डोके (वय २८ सर्वे रा. वडगाव काशिंबेग ता. आंबेगाव) अशी पोलिसांनी अटक केलेल्यांची नावे आहे.वाळूचोरीची घटना बुधवारी (ता.१२) घडली असताना घटनेची माहिती कळताच आंबेगावच्या प्रांत अधिकारी रमा जोशी यांनी मंडलाधिकारी, कामगार तलाठी यांच्यासह गावकऱ्यांना घेऊन घटनास्थळी भेट देऊन या वाळू चोरीचे पंचनामे करुन चोरट्यांच्या विरोधात पोलिसांकडे तक्रार करण्याचे आदेश दिले होते.त्यानुसार मंडल अधिकारी पाडळे यांनी पंचनामा करून कुणीतरी अज्ञात व्यक्तीने वाळूचे अवैध उत्खनन करून सरकारी मालमत्तेची चोरी व पर्यावरणाची हानी केली असल्याची फिर्याद पोलिसांकडे केली होती. त्यानुसार खेड विभागाचे उपविभागिय पोलिस अधिकारी गजानन टोम्पे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक कृष्णदेव खराडे यांनी तपास करून वरील आरोपींना अटक केली असून पुढील तपास पोलिस नाईक एस. आर. मांडवे करत आहेत.