पोंदेवाडी येथील त्या मुलाच्या उपचारासाठी ग्रामस्थांनी केली ४५ हजारांची मदत

प्रमोद दांगट प्रतिनिधी

पोंदेवाडी (ता.आंबेगाव) येथील रहिवासी असलेले बांगर कुटुंबियातील इयत्ता आठवीत शिकणाऱ्या कु. ललीत केशव बांगर या मुलाला काही दिवसापूर्वी घोणस या विषारी सापाने सर्पदंश केला होता. त्या मुलाची घरची परिस्थिती अतिशय गरिबीची असल्याने या मुलावर उपचार करण्यासाठी मदत व्हावी असे आवाहन पोंदेवाडी गावचे सरपंच अनिल वाळुंज यांच्यावतीने करण्यात आले होते.

त्यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत गावातील ग्रामस्थांनी एकत्र येत सुमारे ४५ हजार रुपयांची रोख रक्कम गोळा करत ती सदर मुलावर उपचार करत असलेल्या डॉ. आशिष चव्हाण यांच्याकडे सुपूर्त केली यावेळी पोंदेवाडी गावचे सरपंच अनिल वाळुंज ,जयसिंग पोंदे, संदीप पोखरकर,प्रशांत रोडे ,चंद्रकांत विरकर ,सुरेश नरवडे, यासह इतर ग्रामस्थ उपस्थित होते.

Previous articleवडगाव काशिंबेग गावच्या हद्दीत घोड नदी पात्रातून वाळू उपसा करणाऱ्या चार वाळू माफियांना मंचर पोलिसांनी ठोकल्या बेड्या
Next articleपुणे पोलीस परिमंडळ ३ च्या वतीने सायकल रॅलीचे आयोजन