न्यु ईंग्लिश स्कुल कवठे येमाई दहावी चा निकाल 94.95%

 कवठे येमाई (धनंजय साळवे)- कोव्हीड 19 च्या पार्श्वभूमीवर जवळपास गेल्या दोन वर्षांपासून शाळा ऑनलाईन /ऑफलाइन अशा संमिश्र पद्धतीने सुरू होत्या. विद्यार्थी शाळेपासून दूर होते. ऑनलाइन शिक्षण जरी सुरू असले तरी प्रत्यक्ष शाळा,शिक्षक यांच्यापासून विद्यार्थी दुरावले गेले होते.अशा परिस्थिती कवठे येमाई विद्यालयातील विद्यार्थ्यांनी एस.एस.सी परीक्षेत घवघवीत यश संपादन केले. विद्यालयाचा निकाल 94.95 % इतका लागला.

सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी ,पालक यांनी सर्व विद्यार्थ्यांचे कौतुक केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
रयत शिक्षण संस्थेचे कवठे येमाई येथील न्यु ईंग्लिश स्कुल विद्यालयाने चांगल्या निकालाची परंपरा कायम ठेवली. दहावीच्या परीक्षेमध्ये अनेक विद्यार्थ्यांनी चांगले यश मिळवले.विद्यालयात पहिले तीन आलेले विद्यार्थी पुढीलप्रमाणे.

कु.मुखेकर सुरज गणेश – ९४.००%
कु .भोर सोनाक्षी दौलत ९०.४० %
कु पवळे वेदांत राजेंद्र ९०.२० %

सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे व पालकांचे व त्यांना मागदर्शन करणाऱ्या शिक्षकांचे अभिनंदन ग्रामस्थांकडुन करण्यात आले.

Previous articleखराबवाडी येथील नवमहाराष्ट्र विद्यालयाचा वेदांत बच्चे दहावीच्या परीक्षेत प्रथम
Next articleकवठे येमाई येथे डॉ. उचाळे यांच्या जिवनज्योत हाॅस्पिटलमध्ये अत्याधुनिक ऑपरेशन थिएटर्सचे उद्घाटन