कवठे येमाई येथे डॉ. उचाळे यांच्या जिवनज्योत हाॅस्पिटलमध्ये अत्याधुनिक ऑपरेशन थिएटर्सचे उद्घाटन

कवठे येमाई ( धनंजय साळवे) – अष्टविनायक मार्गावरील एक महत्वाचे गाव म्हणुन कवठे येमाईला ओळखले जाते. अष्टविनायक हा मार्ग अतिजलद झाल्यामुळे रहदारीही वाढु लागली आहे अपघाताचे प्रमाण ही वाढले आहे.रुग्णांना जास्त प्रमाणात लागले तर त्या रुग्णाला शिरुर शिक्रापुर पुणे नगर अशा ठिकाणी न्यावे लागत असे.या दरम्यान बराच वेळ जात असल्यामुळे रुग्णांच्या जीवावर बेतत असे.तसेच काही लहान मोठ्या शस्त्रक्रिया करण्यासाठी रुग्णांना बाहेरगावी जावे लागत असे.रुग्णांची ही गरज ओळखुन डॉ. संतोष उचाळे व त्यांच्या पत्नी डॉ.आरती उचाळे यांनी रुग्नांची गरजओळखुन त्यांच्या दवाखान्यातच हि महत्वाची सेवा चालु केली आहे.

डॉ. उचाळे दांपत्य मुळचे पारनेर तालुक्यातील शिरापुर ह्या गावचे परंतु समाजसेवा व रुग्ण सेवेची आवड असल्यामुळे कवठे येमाई येथे दहा वर्षापुर्वी दवाखाना सुरु केला.रुग्नांना सर्व उपचार एकाच ठिकाण मिळावेत हि सतत धडपड त्याची चालु असते.ह्या ऑपरेशन थिएटरमुळे महिलांच्या प्रसुती,सिझर, रुग्नांचे हार्निया,अपेंडिस,मुळव्याध, फॅक्चर,ई.शस्त्रक्रिया येथेच उपलब्ध होणार आहेत.

या नविन ऑपरेशन थिएटर च्या उद्घाटन प्रसंगी पं.स.सदस्य डॉ. सुभाष पोकळे,मा.सरपंच बबनराव पोकळे,सा.कार्यकर्ते रामदास सांडभोर,जि.प.चे माजी सी.ई.ओ.प्रभाकर गावडे,माजी सरपंच दिपक रत्नपारखी, पुणे जिल्हा सहकारी बँकेचे शाखाधिकारी राजेंद्र चाटे,कवठे प्रा.आ.केंद्राचे डॉ. पानगे,सो.संचालक डॉ. हेमंत पवार, उपसरपंच विठ्ठल मुंजाळ, येस क्लबचे अध्यक्ष नवनाथ सांडभोर, श्री दत्त मंदीराचे पुजारी गणेश काका जोशी,सो.संचालक रितेश शहा,ग्रा.सदस्य निखिल घोडे,पांडुरंग भोर,निलेश पोकळे,सचिन बोर्हाडे,सा.कार्यकर्ते विठ्ठल घोडे,सोपान वागदरे,एल आय सीचे संपत कांदळकरगुरु,दुडे गुरुजी ई.मान्यवर उपस्थित होते.

Previous articleन्यु ईंग्लिश स्कुल कवठे येमाई दहावी चा निकाल 94.95%
Next articleकवठे येमाई येथे डॉ. उचाळे यांच्या जिवनज्योत हाॅस्पिटलमध्ये अत्याधुनिक ऑपरेशन थिएटर्स चे उद्घाटन