खराबवाडी येथील नवमहाराष्ट्र विद्यालयाचा वेदांत बच्चे दहावीच्या परीक्षेत प्रथम

चाकण : खराबवाडी (ता. खेड) येथील नवमहाराष्ट्र विद्यालयातुन दहावीच्या परीक्षेत वेदांत विवेक बच्चे या विद्यार्थ्याने ९५.६० टक्के मार्क्स मिळवून प्रथम क्रमांक पटकावला.

दहावीच्या परीक्षेचा निकाल ९१.१५ टक्के लागला असून या परीक्षेसाठी शाळेतून ३२९ विद्यार्थी बसले होते.त्यापैकी २९९ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून २९ विद्यार्थी अनुत्तीर्ण झाल्याची माहिती मुख्याध्यापक अविनाश कड यांनी दिली.दहावीच्या परीक्षेत वेदांत विवेक बच्चे या विद्यार्थ्याने ९५.६० टक्के गुण मिळवून प्रथम क्रमांक पटकावला,प्रणिता अप्पाजी
घाडगे या विद्यार्थीनीने ९५.२० टक्के गुण मिळवून द्वितीय क्रमांक पटकावला.श्रद्धा विलास खराबी या विद्यार्थीनीने ९५ टक्के गुण मिळवून तृतीय क्रमांक पटकावला.अथर्व किरण बेळंबे या विद्यार्थ्याने ९४.४० टक्के गुण मिळवून चतुर्थ क्रमांक पटकावला.नंदिनी ब्रिजेश पवार या विद्यार्थीनीने ९२.४० टक्के गुण मिळवून पाचवा क्रमांक पटकावला.

सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचे खराबवाडी शिक्षण प्रसारक मंडळाचे संस्थेचे अध्यक्ष शिवाजीराव कड,सचिव गोरक्षनाथ कड, शाळा समिती अध्यक्ष प्रकाश खराबी,मुख्याध्यापक अविनाश कड,संचालक नंदाराम कड ,काळुराम केसवड सर्व संचालक मंडळ,तंटामुक्ति अध्यक्ष रघुनाथ कड,सर्व शिक्षक,शिक्षिका,शिक्षतेकतर कर्मचारी व पालक यांनी सर्व यशस्वी विद्यार्थी व मार्गदर्शक शिक्षक यांचे अभिनंदन केले.वृत्तपत्र क्षेत्रात अनेक वर्षांपासून कार्यरत असलेले दै.पुण्यनगरी पत्रकार व सरपंचनामा न्यूज पोर्टल संपादक विवेक बच्चे यांचा मुलगा वेदांत बच्चे याने दहावीच्या परीक्षेत मिळविलेल्या उत्तुंग यशाबद्दल वेदांतचे खेड तालुक्यातून कौतुक होत आहे.
.

Previous articleकनेरसर येथील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेत नवांगतांचे फेटे बांधून स्वागत
Next articleन्यु ईंग्लिश स्कुल कवठे येमाई दहावी चा निकाल 94.95%