कनेरसर येथील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेत नवांगतांचे फेटे बांधून स्वागत

राजगुरूनगर-कनेरसर (ता.खेड) येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत शैक्षणिक वर्ष सन २०२२-२०२३ ची सुरूवात शाळेत दाखल होणाऱ्या नवांगत विद्यार्थ्यांच्या स्वागताने झाली.नवांगत विद्यार्थ्यांची फेटे बांधून, गुलाबपुष्प देवून वाजत गाजत मिरवणूक काढण्यात आली. त्यांचे औक्षण करून खाऊ वाटप करण्यात आले.

विद्यार्थ्यांना शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष बाळासाहेब जन्याबा दौंडकर, व्यवस्थापन समितीचे सदस्य, पालक यांच्या हस्ते शालेय पुस्तके, गणवेश वाटप करण्यात आले.कार्यक्रमाचे प्रास्ताविक शाळेचे मुख्याध्यापक नानाभाऊ गावडे सर यांनी केले.

सदर कार्यक्रमास शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष बाळासाहेब दौंडकर, शाळा व्यवस्थापन समितीचे सदस्य, पालक शाळेतील शिक्षिका अंजली नामदेव शितोळे मॅडम, सारिका सदानंद राक्षे मॅडम, शुभांगी डिगांबर जाधव मॅडम उपस्थित होते.

Previous articleफुले आंबेडकर विचार संवर्धन समिती संचलित विद्यालयांच्या दहावी व बारावीच्या उत्कृष्ट निकालाची परंपरा कायम
Next articleखराबवाडी येथील नवमहाराष्ट्र विद्यालयाचा वेदांत बच्चे दहावीच्या परीक्षेत प्रथम