जनता विद्या मंदिर विद्यालयाच्या विद्यार्थ्यांचे ढोल- ताशांच्या गजरात स्वागत

घोडेगाव – येथील जनता विद्या मंदिर विद्यालयातील इयत्ता पाचवीच्या वर्गातील विद्यार्थ्यांचे गुलाब पुष्प देऊन तसेच ढोल-ताशांच्या गजरात स्वागत करण्यात आले.

या प्रसंगी संस्थेचे सर्व नवनिर्वाचित संचालक अजितकाका काळे,विश्वास काळे पा, वैभव काळे पा,तुकाराम काळे,सूर्यकांत गांधी, प्रशांत काळे पा अँड. संजय आर्वीकर,नवनाथ काळे सुरेशशेठ काळे (मा.अध्यक्ष),ऍड .मुकुंद काळे, घोडेगाव पोलीस स्टेशनचे साहाय्यक पोलीस निरीक्षक जीवन माने व ग्रामस्थ मोठ्या संख्येने या वेळी उपस्थित होते. तसेच पंचायत समितीचे माजी सभापती सन्माननीय कैलास बुवा काळे यांना वाढदिवसानिमित्त अभीष्टचिंतन करण्यात आले व त्यांनी मुलांना नवीन शैक्षणिक वर्षाच्या मुलांना शुभेच्छा दिल्या.

या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन दिपक ढमढेरे यांनी केले व आभार पर्यवेक्षक ए. एस. काळे यांनी मानले तसेच मुलांना शालेय पुस्तक जेष्ठ नागरिकांच्या हस्ते वाटप करण्यात आले. कार्यक्रमाचे नियोजन प्रशालेच्या उपप्राचार्य कळंबे ए. एस. व उपशिक्षक डी.जे काळे ,एस .एस.जाधव यांनी केले . त्यानंतर कार्यक्रमाची सांगता सर्व शिक्षकवृंद यासकडून मुलांना खाऊवाटप करून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

Previous articleराहुल गांधी यांना खोट्या केसेस मध्ये अडकवण्याचा डाव केल्यामुळे तालुका युवक काँग्रेस व शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने आंदोलन
Next articleशिक्षण क्षेत्रात क्रांती करण्यासाठी मोठ्या देवस्थानांनी पुढाकार घ्यावा – उच्चतंत्र शिक्षणमंत्री उदय सामंत