शिक्षण क्षेत्रात क्रांती करण्यासाठी मोठ्या देवस्थानांनी पुढाकार घ्यावा – उच्चतंत्र शिक्षणमंत्री उदय सामंत

नारायणगाव (किरण वाजगे)

शिक्षणात इतिहास घडवायला देवस्थानची साथ महत्वाची आहे. राज्यातील सर्वच मुख्य देवस्थान ट्रस्टने राज्यातील शिक्षण पद्धती आणि शिक्षण प्रणालीत प्रगती करण्यासाठी पुढाकार घेतला तर पुढील काळात शिक्षण क्रांतीचा इतिहास घडेल. असे प्रतिपादन नामदार उदय सामंत यांनी शुक्रवार (दि. १७ )रोजी सायंकाळी ओझर येथील कार्यक्रमात केले.

अष्टविनायक देवस्थान पैकी प्रमुख असलेल्या ओझरच्या श्री विघ्नहर देवस्थान ने उभारलेल्या गणेश पूजनातील गणपतीच्या आवडत्या २१ वनस्पतीचा समावेश असलेल्या “विघ्नहर उद्यान” चे श्री सामंत यांनी उदघाटन केले त्यावेळी ते बोलत होते.

याप्रसंगी शिवसेना उपनेते व माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील, शिवसेना जुन्नर तालुका प्रमुख ज्ञानेश्वर खंडागळे, जिल्हा परिषद सदस्य आशाताई बुचके, जुन्नर चे नगराध्यक्ष श्याम पांडे, बाजार समितीचे उपसभापती दिलीप डुंबरे, विघ्नहर देवस्थान ट्रस्ट चे अध्यक्ष गणेश कवडे, मोरया गोसावी देवस्थानचे अध्यक्ष श्री देव, उपविभागीय पोलिस अधिकारी मंदार जावळे, विघ्नहर गार्डन साठी देणगी दिलेले देणगीदार गोविंद खिलारी, ओझरचे सरपंच उपसरपंच सदस्य अन्य देणगीदार, विघ्नहर देवस्थान ट्रस्टचे पदाधिकारी संचालक तसेच ग्रामस्थ व गणेशभक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गणेश मोढवे यांनी केले.

Previous articleजनता विद्या मंदिर विद्यालयाच्या विद्यार्थ्यांचे ढोल- ताशांच्या गजरात स्वागत
Next articleफुले आंबेडकर विचार संवर्धन समिती संचलित विद्यालयांच्या दहावी व बारावीच्या उत्कृष्ट निकालाची परंपरा कायम