राहुल गांधी यांना खोट्या केसेस मध्ये अडकवण्याचा डाव केल्यामुळे तालुका युवक काँग्रेस व शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने आंदोलन

कुरकुंभ , सुरेश बागल

राजकीय सूड‌बुद्धीन विरोधी पक्षातील नेत्यांना व कॉंग्रेस पक्षाचे माजी अध्यक्ष व खासदार राहुल गांधी याना खोट्या केसेस मध्ये गुंतवून विरोधी पक्षाचा आवाज दाबण्याचे काम आज केंद्रसरकार करीत आहे ई डी, सी बी आय, एक सी बी, इन्कमटॅक्स, सारख्या तपास यंत्रणाचे गैरवापर होत आहे त्याच पद्धतीने अग्नीपथ या अन्यायकारक लष्कर भरती विरुद्ध युवक कॉंग्रेस च्या वतीने (दि .१७)रोजी छ. शिवाजी महाराज चौक ,दौंड येथे संध्याकाळी ७:०० वाजता मशाल व हातात निषेध फलक घेऊन निदर्शन करण्यात आली.

सदर प्रसंगी पुणे जिल्हा पर्यावरण जिल्हाध्यक्ष तन्मय पवार,दौंड शहर अध्यक्ष हरेष ओझा, युवक तालुका अध्यक्ष श्रेयस मुनोत, अल्पसंख्यक कॉंग्रेस शहराध्यक्ष रज्जाक भाई शेख, अतुल थोरात, अतुल जगदाळे, विठ्ठल शिपलकर,जमीर सय्यद, सुरेश क्षिरसागर,सलीम शेख, विनोद नगरे,वसीम सय्यद सर्व पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.कार्येक्रमाचे नियोजन युवक तालुका अध्यक्ष श्रेयस मुनोत ह्यानी केले.

Previous articleआमोडीत विद्यार्थ्यांचे गुलाब पुष्प देऊन स्वागत
Next articleजनता विद्या मंदिर विद्यालयाच्या विद्यार्थ्यांचे ढोल- ताशांच्या गजरात स्वागत