आमोडीत विद्यार्थ्यांचे गुलाब पुष्प देऊन स्वागत

घोडेगाव

जिल्हा परिषद प्राथमिक केंद्र शाळा आमोंडी (ता.आंबेगाव जि.पुणे) शाळेतील इयत्ता १ली ते ७ वी च्या वर्गातील विद्यार्थ्यांचे गुलाब पुष्प देऊन तसेच नवीन वह्या पुस्तके देऊन विद्यार्थ्यांच्या डोक्यावर पुष्यवृष्टी करून व चॉकलेट देऊन स्वागत करण्यात आले.

या प्रसंगी शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष धनंजय यशवंत फलके,शालेय व्यवस्थान समितीचे उपाध्यक्ष नवनाथ किसन फलके व गावचे सरपंच निलेश काळे ,ग्रामपंचायत सदस्य तसेच आरोग्य अधिकारी, ज्ञानेश्वर काथेर,पोलीस पाटील निलम फलके सामाजिक कार्यकर्ते अशोक फलके,सोपान फलके ,विष्णू राजगुरू,सुरेश फलके,प्रतिभा मिंडे,सर्व अंगणवाडी सेविका मुख्याध्यापिका सौ.सरला खराडे सर्व सहायक शिक्षक व विद्यार्थ्री यांच्या उपस्थिती शाळा प्रवेश स्वागत समारंभ घेण्यात आला कोरोनाच्या दोन वर्षाच्या काळा नंतर पहिल्यांदाच उत्साहात विद्यार्थ्यांचे स्वागत प्रमुख पाहुण्याच्या उपस्थितीत कार्यक्रम घेण्यात आला.

शाळेतील स्वच्छता ,परिसरातील झाडे,संगणककक्ष,किचन ,प्रयोगशाळा पाहून तालुक्यातील एक आदर्श शाळा म्हणून इतर शाळेने या शाळेचा आदर्श घ्यावा असे गौरवोदगार शाळेचे केंद्रप्रमुख यांनी काढले
या शाळेतील लहान लहान गोष्टी कडे जय हनुमान प्रतिष्ठाण व गावातील ग्रामस्थ यांचे लक्ष असून सर्व शिक्षक व कर्मचारी यांच्या सहकार्याने शाळेचा सर्व प्रकारच्या विकासासाठी प्रयत्न करीत असतात अशी माहिती मुख्यध्यपिक सौ.खराडे मॅडम यांनी दिली

अशा प्रकारे आजचा पहिला दिवस प्रवेशाचा विद्यार्थ्यांनाच्या स्वागतासाठी चांगल्या प्रकारे साजरा करण्यात आला

Previous articleशेतकऱ्यांसाठी माती परीक्षण प्रात्यक्षिक करताना कृषिदूत
Next articleराहुल गांधी यांना खोट्या केसेस मध्ये अडकवण्याचा डाव केल्यामुळे तालुका युवक काँग्रेस व शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने आंदोलन