शेतकऱ्यांसाठी माती परीक्षण प्रात्यक्षिक करताना कृषिदूत

करमाळा : ग्रामीण कृषि कार्यानुभव कार्यक्रमाअंतर्गत सद्गुरु कृषी महाविद्यालय कृषिदूतांतर्फे वीट (सोलापूर) येथे माती परीक्षण प्रात्यक्षिकाचे आयोजन करण्यात आले. शेतकऱ्यांमध्ये माती परीक्षणसंबंधी जनजागृती व्हावी, यासाठी उपक्रम राबविण्यात आले आहेत. यामध्ये पिके काढल्यानंतर किंवा पेरणीपूर्वी,रासायनिक खते देण्यापूर्वी किंवा खते दिल्यानंतर तीन महिन्यांनी मातीचा नमुना घ्यावा, माती परीक्षणानुसार खत व्यवस्थापन कराव, असा सल्ला कृषीदूतांनी शेतकऱ्यांना दिला. याबरोबर शेतातील मातीचे नमुने गोळा करून त्याचे परीक्षण करण्यात आले. मातीमध्ये असणारे घटक,जमिनीचा सामू, मातीचा प्रकार याविषयी शेतकऱ्यांना योग्य ते मार्गदर्शन देण्यात आले.

दर्शन काकुस्ते, प्रथमेश गाढवे, मयुर भिंगारदे, पांडुरंग चव्हाण, सौरभ तोरणे या कृषीदूतांनी मार्गदर्शन केले. या उपक्रमासाठी विद्यार्थ्यांना प्राचार्य डॉ. रामदास बीटे सर,कार्यक्रम समन्वय- सागर खिलारे सर, कार्यक्रम अधिकारी- प्र. चांगदेव माने सर, विषय विशेषज्ञ- प्र. पूजा इनामके मॅडम, यादव सर,पाटील सर यांचे मार्गदर्शन लाभले. याप्रसंगी सरपंच सौ. वंदना उदय ढेरे व उपसरपंच अनुराधा समाधान कांबळे व आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते.

Previous articleयवत मध्ये बनावट एशियन पेंट तयार करणाऱ्या कारखान्यावर पोलिसांचा छापा ; तब्बल ७८ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त
Next articleआमोडीत विद्यार्थ्यांचे गुलाब पुष्प देऊन स्वागत