यवत मध्ये बनावट एशियन पेंट तयार करणाऱ्या कारखान्यावर पोलिसांचा छापा ; तब्बल ७८ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त

योगेश राऊत, पाटस

एशियन पेंन्टसच्या नावाखाली बनावट रंगाची विक्री करणाऱ्या यवत (ता. दौंड) येथील दुकानदारावर गुन्हा दाखल करण्यात आले आहे. त्याच्याकडून तब्बल ७८ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त हस्तगत करण्यात आला आहे.

नितीन अशोक जगदाळे (वय ४२ , रा. जगदाळेवस्ती , भरतगाव , ता.दौंड ) असे गुन्हा दाखल झालेल्या दुकानदाराचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नितीन जगदाळे याचे भुलेश्वर मार्केटमध्ये भुलेश्वर पेंन्टस आणि हार्डवेअरचे दुकान आहे. या दुकानातून बनावट एशियन पेंन्टची विक्री केली जात असल्याची माहिती संबंधित कंपनीच्या अधिकाऱ्यांना मिळाली. अधिकाऱ्यांनी त्याच्यावर कारवाई करण्यासाठी यवत पोलिसांना मागणी केली होती.

मिळालेल्या माहितीचा खातीरजमा करण्यासाठी यवत पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक नारायण पवार यांच्या मार्गदर्शन पोलिस उपनिरीक्षक पद्मराज गंपले व त्यांच्या पथकाने त्या ठिकाणी छापा टाकला. तेव्हा पोलिसांनी दुकानाची पाहणी केली असता, दुकानामध्ये एशियन पेंन्टच्या २३ हजार ८५० रुपय्र किंमतीच्या पावती नसलेल्या ९ बकेट आढळून आल्या.
त्यानंतर यवत पोलिसांनी नितीन जगदाळे यांच्या यवत स्टेशन रस्त्यावर असलेल्या गोडावूनमध्ये धाड टाकली. तेव्हा पोलिसांना गोडावूनमध्ये एशियन पेंन्टस कंपनीच्या बनाबट स्टिकर असलेल्या २० लिटरच्या एकुण १११ बकेट आणि १०२ बनावट स्टिकर असा एकुण सुमारे ७८ हजारे ७२० रुपयांचा बनावट आढळून आला. पोलिसांनी सदर मुद्देमाल हस्तगत केला आहे. आणि नितीन जगदाळे याच्यावर यवत पोलीस ठाण्यात कॉपीराईटसह इतर गुन्हे दाखल करण्यात आले आहे. तरी, पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक पी.आर. गंपले करीत आहे

सदर कारवाई यवत पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक नारायण पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक पी.आर. गंपले , सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक एन.व्ही.जगताप , रविंद्र गोसावी आणि निखिल रणदिवे यांच्या पथकाने केली आहे.

Previous articleग्रामीण कृषी जागरूकता आणि कृषी औद्योगिक कार्यानुभव कार्यक्रम
Next articleशेतकऱ्यांसाठी माती परीक्षण प्रात्यक्षिक करताना कृषिदूत