कवठे येमाई येथे वादळीवार्यासह पावसाची दमदार हजेरी

कवठे येमाई (प्रतिनिधी- धनंजय साळवे) कवठे येमाई येथे शुक्रवार दिनांक 10/06/2022 पावसाने दमदार हजेरी लावली .गेली काही दिवस पाऊस ह्या भागाला हुलकावणी देत होता मात्र तो एकटा न येता जोरदार वार्यासह आला . त्यामुळे काही ठिकाणी झाडे पडण्याच्या घटना घडल्या कवठे वि.का.सोसायटी व पशुवैद्यकिय दवाखान्याच्या समोरील सुमारे शंभर वर्षापुर्वीचे वडाचे झाड मूळासकट उन्मळुन पडले.झाडाखाली उभ्या असणाऱ्या बोलेरो जीप,व पिकअप ह्या गाड्यांचे चांगलेच नुकसान झाले.सुदैवाने कोणतीच जिवीतहानी झाली नाही.तसेच काही ठिकाणी वीज गेली होती.परंतु वीज कर्मचार्यांच्या सतर्कतेमुळे लवकर जोडणी करुन वीजप्रवाह बर्याच ठिकाणी सुरळीत करण्यात यश आले.ह्या पावसाने शेतकरी वर्ग सुखावला आहे.अनेक पिकांना याचा फायदा होईल.गावच्या काही भागात खुशी तर काही भागात पावसाने हिरमोड केला.गावच्या पुर्वेकडील भागातील लोकांना पावसाने नाराज केले.तर ईतर भागात चांगला झाला.

Previous articleचाकणमध्ये शालेय पोषण आहार विकताना मुख्याध्यापकासह , संस्थेच्या अध्यक्षाला रंगेहाथ पकडले, चाकण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
Next articleपुणे-सोलापूर महामार्गावरील कांचन हॉटेलच्या मालकाला साडेचार लाखाचा गंडा घालणाऱ्या बोगस फूड इन्स्पेक्टरला यवत पोलिसांनी ठोकल्या बेड्या