चाकणमध्ये शालेय पोषण आहार विकताना मुख्याध्यापकासह , संस्थेच्या अध्यक्षाला रंगेहाथ पकडले, चाकण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

चाकण: बिरदवडी गावातील बाबुराव पवार महाविद्यालयातून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. चक्क खाऊ गदाड्या प्रभारी मुख्याध्यापक व्ही.एम.चव्हाण व संस्थेची अध्यक्षा तसेच पिंपरी चिंचवड मधील प्रतिष्ठित महाविद्यालयातील प्राध्यापिका देवयानी पवार यांनी शालेय मुलांचा पोषण आहार चक्क एका कॅटिंग वाल्याला विक्री करत असताना  पुष्पा म्हसे या बहाद्दूर शिक्षिकेच्या चातुर्य पणामुळे मुख्याध्यापक व संस्थेच्या अध्यक्षा यांचा हा प्रताप उघड झाला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पुष्पा दामोदर म्हसे( वय-४०), या शिक्षिका असलेल्या व सध्या हुतात्मा राजगुरू महाविद्यालयात शिक्षिका म्हणून कर्तव्य बजावत असलेल्या शिक्षिका पुष्पा म्हस्के दि१० जून २०२२ रोजी सायंकाळी ६ वाजता त्यांच्या मालकीचे दवणे वस्ती येथील वर्क शॉप येथे गेल्या होत्या. त्यानंतर त्या वर्कशॉप वरील काम उरकून सायंकाळी अंदाजे ७ वाजताच्या सुमारास पुन्हा त्यांच्या घरी जात असताना जवळच असलेल्या बिरदवडी येथील बाबुराव पवार महाविद्यालयात एक पांढऱ्या रंगाची चारचाकी वाहन शाळेच्या पोषण आहार साठवणूक खोलीजवळ उभी असल्याचे शिक्षिका पुष्पा म्हसे यांना दिसले. त्यांना या वाहनावर शंका आल्याने त्या सदर वाहना जवळ गेल्या असता त्या ठिकाणी शाळेचे प्रभारी मुख्याध्यापक व्ही.एम.चव्हाण व संस्थेच्या अध्यक्षा व स्वतः प्राध्यापिका असलेल्या देवयानी पवार त्या ठिकाणी असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. तसेच एक वाळुंज नामक कॅटिंगवाला व्यक्तीही त्यांच्या बरोबर असल्याचे म्हसे यांच्या निदर्शनास आले.

यावर या कार्यतत्परता दाखवणाऱ्या शिक्षिकेने त्यांच्याकडे चौकशी केली असता कॅटिंगवाला वाळुंज व त्यांच्या सोबत असलेल्या ड्रायव्हर हे दोघे मिळून घाईघाईने शाळेतील शालेय पोषण आहार रूममधून धान्याचे पोते सदर वाहनांमध्ये भरत असल्याचे दिसून आले.

यावर या बहाद्दूर शिक्षिकेने उपस्थित प्रभारी मुख्याध्यापक व संस्थेची मुजोर अध्यक्षा यांना हा काय प्रकार आहे. हे विचारले असता, मुजोर अध्यक्षा देवयानी पवार व मुख्याध्यापक व्ही.एम.चव्हाण यांनी या शिक्षिकेला ओरडून सांगितले की, तुझे या शाळेत काय काम आहे. आम्ही धान्य विकू अथवा काही करू, असे म्हणून या खाऊ गदाड्या दोघांनी हलकटकुत्रे  येथून निघून जा असे म्हणून स्वतः पेशाने प्राध्यापिका असूनही सुसंस्कृत पणाला तिलांजली वाहून एका बहादूर शिक्षिकेला शिव्यांची लाखोली वाहिली. म्हणजे पोषण आहार विकून आपले घरे भरणाऱ्या मुजोर मुख्याध्यापक व संस्थेच्या प्राध्यपिका अध्यक्षा यांनी जसे स्वतःच्या घरातून पोषण आहार दिला असा रुबाब या शिक्षिकेवर दाखवला. त्यानंतर हे यावरच थांबले नाही तर ज्या गाडीत पोषण आहाराचे पोते टाकले होते त्या गाडी चालकाने त्या शिक्षिकेला ढकलून पळून जाण्याचाही धक्कादायक प्रकार घडला.

पण ती बहाद्दूर शिक्षिका एवढे होऊनही मागे हटेल ती कशी, एवढे होऊनही ती गाडी पळविण्याचा प्रयत्न होत होता तेव्हा या शिक्षिका थेट गाडीवर चढल्या शेवटी या बाई माघार घेत नाही हे पाहिल्यावर त्या गाडी चालकाने गाडी सोडून पळ काढला. त्यास पळपळ असे म्हणून कॅटिंग मालक वाळुंज याने मदत केल्याचे पुष्पा म्हसे यांनी आपल्या जबाबात नमूद केले आहे. यानंतर पुष्पा म्हसे यांनी पोलीस कंट्रोलरूमला फोन करून सदर घटनेची माहिती दिली. यावर तातडीने पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पोलीस आल्यानंतर सदर गाडी धान्यांच्या पोत्यांसह पोलीस स्टेशनला नेण्यात आली. आता यावर मुजोर व खाऊ गदाडे मुख्याध्यापक व संस्थेच्या अध्यक्षा व स्वतःप्राध्यापिका असलेल्या देवयानी पवार यांच्यावर परिसरातून कडक कारवाईची मागणी होत आहे. असे बाळ गोपाळांच्या तोंडातील घास हिरावून घेणाऱ्या या खाऊ गदाड्या दोघा दोषींवर कडक कारवाई व्हावी अशी मागणी आता पालक वर्गातून होत आहे. यावर आता पुणे शिक्षण विभाग काय कारवाई करतो हेच पहावे लागेल.

यानंतर पुष्पा म्हसे धाडशी पणामुळे त्या ठिकाणचे स्थानिक शोभा मच्छिंद्र पवार यांनी सांगितले की, याठिकाणी या अगोदरही बऱ्याच वेळा धान्य विक्री झाल्याचे निदर्शनास आले आहे. ही गाडी पकडून देण्यास स्थानिक मच्छिंद्र बाबुराव पवार व त्यांच्या मुलानेही सहकार्य केल्याचे पुष्पा म्हसे यांनी सांगितले. मुख्याध्यापक व संस्था अध्यक्षा प्राध्यापिका यांची शासकीय धान्य सांभाळण्याची जबाबदारी असून तेच जर असे चव दवडे प्रताप करत असतील तर ते धान्य राखायचे कुणी हाच प्रश्न उपस्थित होत आहे.

या प्रकरणात पुष्पा म्हसे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून, संस्था अध्यक्षा, देवयानी पवार, प्रभारी मुख्याध्यापक व्ही. एम.चव्हाण, ईशान पवार, अनिल चौगुले यांच्यावर भारतीय दंड संहिता १८६० नुसार ४०८, ५०४, ५०६, ३४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच एक एम एच १२ सी.एच ५१८२ नंबरची पिकअप गाडीसह १५ पोती तूरडाळ व तांदूळ अंदाजे ३० हजार किमतीचे धान्य पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक जऱ्हाड व त्यांचे सहकारी करत आहेत.

Previous articleजिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत आंबेगाव तालुक्यात अनु जाती व नवबौद्ध समाजाला आरक्षण मिळावे ; गौतमराव खरात यांची राज्य निवडणूक आयोगाकडे मागणी
Next articleकवठे येमाई येथे वादळीवार्यासह पावसाची दमदार हजेरी