जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत आंबेगाव तालुक्यात अनु जाती व नवबौद्ध समाजाला आरक्षण मिळावे ; गौतमराव खरात यांची राज्य निवडणूक आयोगाकडे मागणी

घोडेगाव- जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या गट व गणाची आगामी निवडणुकीसाठी प्रारुप रचना तयार झाली असून पुणे जिल्हा परिषद मध्ये ८२ गटांपैकी ०८ गट अनु जाती साठी व ०६ गट अनु जमाती साठी आरक्षित होणार आहे जाती निहाय आरक्षण निश्चित करताना २००२ मध्ये निश्चित केलेल्या आरक्षणाचा मूळ आधार घेतला जाणार आहे ज्या गटात कधीच अनु जाती व अनु जमातीचे आरक्षण पडले नाही तेथे त्या त्या प्रवर्गातील लोकसंख्येच्या प्राधान्य क्रमाने आरक्षण टाकण्यात येणार आहे.

२००२ मध्ये घेण्यात आलेले आरक्षण विचारात घेतले जाणार आहे त्यानंतर ज्या गटामध्ये यापूर्वी कधीही अनु जाती-जमातीचे आरक्षण आले नाही अशा गटांना प्राधान्य दिले जाणार आहे अनु जाती जमाती ची लोकसंख्या} उतरत्या क्रमाने लावली जाईल या मध्ये पूर्वी ज्या गटामध्ये आरक्षण देण्यात आले होते ते गट वगळले जातील त्यानंतर प्राधान्य क्रमाने दोन्ही प्रवर्गासाठी आरक्षण होईल.

आरक्षणासाठी हे सूत्र विचारात घेतले तर आंबेगाव तालुक्यात १९८५ पासून अनु जातीच्या प्रवर्गाला जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीत आरक्षण मिळाले नसून हा समाज आरक्षणापासून गेली ३५ ते ४० वर्ष वंचित राहिला असून २००१ व २०११ च्या जनगणनेच्या आकडेवारी चुकीच्या लागल्यामुळे आरक्षण सोडत होत नाही सदरची जनगणना चुकीची असल्याचे शासनाच्या निदर्शनास निवेदने, मोर्चे,आंदोलन,वर्तमानपत्र बातम्या मधून आणून दिले असून हरकतीच्या माध्यमातून तत्कालीन विभागीय आयुक्त मा श्री चोकलिंगम साहेब यांच्या पुढे जनगणना लोकसंख्या आणि प्रत्यक्ष असलेली लोकसंख्या यामधील तफावत निदर्शनास आणून दिली आहे या मध्ये जनगणना आकडेवारी आणि प्रत्यक्ष असलेली लोकसंख्या यात खूप फरक आहे म्हणून आगामी स्थानिक स्वराज्य संस्था च्या निवडणुकीत आंबेगाव तालुक्यात अनु जाती च्या प्रवर्गाला जिल्हा परिषद सदस्य व पंचायत समिती सदस्य पदाचे आरक्षण देऊन समाजाला न्याय द्यावा असे आशयाचे निवेदन खरात यांनी निवडणूक आयोगाला दिले आहे

Previous articleवीज कंत्राटी कामगारांच्या बदल्यांना स्थगिती
Next articleचाकणमध्ये शालेय पोषण आहार विकताना मुख्याध्यापकासह , संस्थेच्या अध्यक्षाला रंगेहाथ पकडले, चाकण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल