वीज कंत्राटी कामगारांच्या बदल्यांना स्थगिती

कुरकुंभ : सुरेश बागल

पुणे बारामती सोलापूर सातारा, सांगली, कोल्हापूर येथील सुमारे ४००० वीज कंत्राटी कामगारांच्या बदल्यां व अन्य विषयाबाबत आज गुरुवार ( दि. ९ )रोजी मंत्रालयात. ऊर्जा राज्य मंत्री मा.ना.प्राजक्त दादा तनपुरे यांच्या सोबत महाराष्ट्र विज कंत्राटी कामगार संघ (संलग्न भारतीय मजदूर संघ )संघटनेची मिटिंग झाली. पश्चिम महाराष्ट्राती बदल्यांना त्यांनी आज अंतिम स्थगिती दिली.

तसेच या कष्टकरी कंत्राटी कामगारांची आर्थिक पिळवणूक करणाऱ्या कंत्राटदारांवर स्थानिक अधिकाऱ्यांनी कारवाई करावी अन्यथा त्यांच्यावरही कारवाई केली जाईल असे सूचित केले. पैश्याची मागणी वेतनात कपात या समस्यां सोडवण्यासाठी संघटना प्रतिनिधी व प्रशासनाने यावर एकत्र बसून एक महिन्यात यावर उपाय योजना करावी. कंत्राटदार विरहित सेवा घेण्याबाबत संघटनेच्या सल्याने कंपनीचे पैसे वाचत आहेत यातून कामगारांना जॉब सिक्युरिटी मिळेल व त्यांचे पगार डायरेक्ट कामगारांच्या बँक खात्यात जमा होती.

यावेळी अण्णाजी देसाई, निलेश खरात, उमेश आनेराव, राहुल बोडके, सागर पवार संतोष अंबाड, राजू आव्हाड उपस्थित होते.

Previous articleनारायणगाव सोसायटीच्या वतीने १३ कोटी २५ लाखाचे पीक कर्ज वाटप
Next articleजिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत आंबेगाव तालुक्यात अनु जाती व नवबौद्ध समाजाला आरक्षण मिळावे ; गौतमराव खरात यांची राज्य निवडणूक आयोगाकडे मागणी