नारायणगाव सोसायटीच्या वतीने १३ कोटी २५ लाखाचे पीक कर्ज वाटप

नारायणगाव (विशेष प्रतिनिधी)

उत्तर पुणे जिल्ह्यामधील अग्रगण्य असलेल्या नारायणगाव विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीच्या वतीने या आर्थिक वर्षात १३ कोटी २५ लाख रुपये पिक कर्ज वाटप करण्यात आले असून राज्य शासनाने नियमित कर्ज भरणाऱ्या ११५१ शेतकऱ्यांना अनुदान रुपी प्रत्येकी पन्नास हजार रुपये मिळवून देण्यासाठीचा प्रस्ताव शासनास पाठविण्यात आला असल्याची माहिती संस्थेचे चेअरमन संतोषनाना खैरे व व्हाईस चेअरमन किरण वाजगे यांनी दिली.

नारायणगाव विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीच्या सन २०२२-२०२३ सालातील खरीप हंगामात आज अखेर ९९६ सभासदांना रक्कम रुपये १३ कोटी २५ लाख इतके पीक कर्ज वाटप करण्यात आले आहे.
पीक कर्ज वाटप करतेवेळी पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष, संचालक मंडळ आणि नारायणगाव शाखेचे अधिकारी कर्मचारी वर्गाचे विशेष सहकार्य लाभले आहे.
आज आखेर संस्थेला रक्कम रुपये २५ कोटी ५१ लाख रुपये कर्ज येणे बाकी आहे. सोबतच सन २०२१-२२अखेर संपलेल्या आर्थिक वर्षात संस्थेने दिनांक ३१-०३-२०२२ अखेर बँक पातळीवर संस्थेची कोणत्याही प्रकारची थकबाकी नाही. तसेच ३१-३-२०२२ अखेर १५ कोटी ४३ लाख रुपये येणे बाकी आहे. त्यापैकी पीक कर्ज ७ कोटी व मध्यम मुदत, दीर्घ मुदत कर्ज ८ कोटी ४३ लाख ₹ देणे बाकी आहे. संस्था पातळीवर सभासद पीक कर्ज रक्कम रुपये ९ कोटी व मध्यम मुदत दीर्घ मुदत कर्ज ८ कोटी ₹ येणे बाकी आहे. तसेच दिनांक ३१-३-२०२२ अखेर तरतूद पूर्व नफा अंदाजे रक्कम रुपये ५० लाख एवढी अपेक्षित आहे. अशी माहिती संस्थेचे चेअरमन संतोष नाना खैरे व व्हाईस चेअरमन किरण वाजगे यांनी दिली.

चालू सन २०२२-२३ या खरीप हंगामामध्ये ९९६ सभासदांना रक्कम रुपये १३ कोटी २५ लाख टोमॅटो,, द्राक्षे, डाळिंब, ऊस या विविध पिकांसाठी कर्ज वाटप करण्यात आले आहे. या पैकी नवीन १०५ सभासदांची ४३ लाख पन्नास हजार रुपयांची वाढ झाली आहे. तसेच येत्या काळात तर रब्बी हंगामात होणारे कर्जवाटप लक्षात घेता साधारणतः एकूण पीक कर्ज २९ ते ३० कोटींचे वाटप करण्याचा मानस संस्थेच्या संचालक मंडळाचा आहे.
राज्य शासनाने नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर रक्कम म्हणून रुपये ५० हजार देण्याचे जाहीर केले असून त्यासंदर्भात संस्थेच्या ११५१ सभासदांची माहिती संस्थेने राज्य शासनाकडे पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या माध्यमातून सुपूर्द केली आहे. तसेच मागील हंगामामध्ये राज्य शासनाने शेतकऱ्यांकडून व्याज वसूल केले आहे. सदर व्याज परताव्याचा प्रस्ताव संस्थेने राज्य शासनास सादर केला असून डीबीटी स्कीम म्हणजेच थेट लाभ हस्तांतरण योजनेअंतर्गत सभासदांना त्यांच्या बँक बचत खात्यामध्ये जमा होणार आहे. असे चेअरमन संतोष नाना खैरे व व्हाईस चेअरमन किरण वाजगे यांनी सांगितले.

यापुढील काळात संस्थेच्या वतीने खते, औषधे, बी-बियाणे, शेती उपयोगी अवजारे यांचा व्यवसाय करून संस्थेचा विकास वृद्धिंगत करण्याचे उद्दिष्ट समोर ठेवत केंद्र शासनाच्या ऍग्रीकल्चर डेव्हलपमेंट फंड (ए आय एफ) द्वारे बहुउद्देशीय व्यवसाय सुरू करण्यासाठी संस्थेच्या मालकीच्या सहा गुंठे जागेमध्ये नवीन व्यवसाय संकुल उभारणार आहे. अशी माहिती संस्थेचे सचिव गणेश गाडेकर यांनी दिली.

Previous articleनुपुर शर्मा व नवीन जिंदल यांचा नारायणगावात मुस्लिम समाजातर्फे निषेध
Next articleवीज कंत्राटी कामगारांच्या बदल्यांना स्थगिती