नुपुर शर्मा व नवीन जिंदल यांचा नारायणगावात मुस्लिम समाजातर्फे निषेध

किरण वाजगे

नारायणगाव वारुळवाडी परिसरातील जमात रजा ए मुस्तफा या संघटनेच्या वतीने तसेच मुस्लीम समाज बांधवांच्या वतीने आज शुक्रवार दिनांक १० रोजी नारायणगाव पोलिस स्थानकामध्ये येऊन वादग्रस्त विधान करणारी भारतीय जनता पक्षाची प्रवक्ता नुपूर शर्मा व नवीन जिंदल यांच्या विरोधात निषेध व्यक्त करत त्यांना अटक करावे याबाबतचे निवेदन दिले आहे.

नारायणगाव पोलीस स्थानकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक पृथ्वीराज ताटे यांनी याबाबतचे निवेदन स्वीकारले. याप्रसंगी नारायणगावचे उपसरपंच अरिफ आतार, इमाम बारी साहब रजवी, एजाज याकूब आतार, जुबेर आतार, तोसिफ कुरेशी, समीर इनामदार, जुबेर शेख, सलमान आतार, लुकमान इनामदार, जावेद पटेल तसेच अनेक मुस्लिम समाजाचे कार्यकर्ते उपस्थित होते.

यावेळी इजाज कुरेशी, जुबेर शेख समीर इनामदार यांनी मनोगत व्यक्त करत नुपुर शर्मा व नवीन जिंदल यांचा निषेध केला.
नारायणगाव पोलीस स्थानकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक पृथ्वीराज ताटे यांनी सर्वांना शांतता, सलोखा व कायदा सुव्यवस्था राखण्याचे आवाहन केले.

Previous articleसोन्याचे दागिने व ४५ मोटारसायकली चोरणाऱ्या टोळीला आळेफाटा पोलिसांनी केले जेरबंद
Next articleनारायणगाव सोसायटीच्या वतीने १३ कोटी २५ लाखाचे पीक कर्ज वाटप