टिळेकरवाडी येथे खरीप पिकांबाबत शेतकऱ्यांना कृषी अधिकांऱ्यानी केले मार्गदर्शन

उरुळी कांचन

टिळेकरवाडी (ता.हवेली) येथे महाराष्ट्र शासन कृषि विभाग व कृषी महाविद्यालय पुणे मार्फत जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी ज्ञानेश्वर बोटे, पुणे सत्यवान नऱ्हे उपविभागीय कृषी अधिकारी पुणे यांच्या मार्गदर्शनाखाली खरीप हंगाम पुर्व शेतकरी चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते.

खरीप हंगाम पुर्व शेतकरी चर्चासत्रात डॉ.प्रा.श्रीहरी हसबनीस सर कृषी महाविद्यालय पुणे यांनी डाळींबा वरील मररोग तेल्यारोग, पिन होल बोरर व शॉर्ट होल बोरर नियंत्रनाबाबत सविस्तर मार्गदर्शन उपस्थित शेतकऱ्यांना केले. तालुका कृषि अधिकारी,हवेली मारुती साळे यांनी महाराष्ट्र शासन कृषि विभागाच्या विविध योजना महाडीबीटी पोर्टल बाबत सविस्तर मार्गदर्शन उपस्थित शेतकऱ्यांना केले.

मंडळ कृषी अधिकारी जि. के.कडलग यांनी उपस्थितांचे स्वागत केले. सदर प्रशिक्षण वर्गास डॉ. सुनील जोगदंड सर विभागीय विस्तार केंद्र पुणे, संतोष बापू टिळेकर माजी सरपंच,बाळासाहेब चौरे कृषीनिष्ठ शेतकरी , आदर्श डाळींब उत्पादक बाळासाहेब टिळेकर,गणेश टिळेकर ,अमोल टिळेकर, कालिदास झगडे कृषी पर्यवेक्षक रामदास डावखर ,कृषि सहाय्यक,श्री‌.अमित साळुंखे राजेंद्र भोसेकर व इतर शेतकरी उपस्थित होते.

Previous articleजुन्नर आंबेगावच्या सीमेवर बिबट्याच्या मादीचा अज्ञात वाहनाच्या धडकेने मृत्यू
Next articleबारामती मध्ये पर्यावरण परिषदेचे आयोजन; प्रत्येकाने पर्यावरणासाठी वेळ काढण्याचे सुनेत्रा पवार यांचे आवाहन