शेतकरी ते ग्राहक थेट विक्री केंद्राचे जिल्हा कृषी अधिकारी ज्ञानेश्वर बोटे यांचे हस्ते उद्घाटन संपन्न

उरुळी कांचन

विकेल ते पिकेल या संकल्पनेवर आधारित संत शिरोमणी सावता माळी रयत बाजार अभियानाचा अनुषंगाने शेतकरी ते थेट ग्राहक विक्री व्यवस्था व त्यासंबंधित मुल्यसाखळी संवर्धन या अनुषंगाने हवेली तालुक्यातील आळंदी म्हातोबा पुणे येथील सद्गुरू नेच्युरल फार्मीग शेतकरी गटाचे विजय सुरेश जवळकर यांचे सेंद्रिय प्रमाणीकरण केलेल्या केशर या आंबा वाणाचे विक्री केंद्राचे उद्घाटन जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी पुणे ज्ञानेश्वर बोटे यांचे हस्ते झाले. यावेळी लोणी काळभोर येथील शेतकरी उत्तम लक्ष्मण दुंडे यांनी सेंद्रिय पद्धतीने बनविलेल्या खपली गहू विक्री केंद्राचे उद्घाटन सुद्धा करण्यात आले. उपविभागीय कृषि अधिकारी पुणे यांचे प्रांगणात सेंद्रिय शेती मालास ग्राहकांचा उत्स्पुर्त प्रतिसाद मिळाला. सेंद्रिय आंबा फळास पूर्णतः सेंद्रिय पद्धतीने तसेच कागदी पिशवी चा वापर केल्याने फळे व कीड रोग विरहित तयार झाली. तसेच खपली गहू पौष्टीक असल्याने त्यास अतिशय चांगली चव व ग्लुटेन चे प्रमाण कमी असल्याने त्याचा आरोग्याचा दृष्टीने अधिक फायदेशीर आहे.

या प्रसंगी उपविभागीय कृषि अधिकारी पुणे सत्यवान नऱ्हे, तंत्र अधिकारी प्रमोद सावंत, वैशाली भूसावरे, जयश्री कदम, हवेली तालुका कृषि अधिकरी मारुती साळे, कृषि अधिकारी गणेश धस, मंडळ कृषि अधिकारी हनुमंत खडे शिवाजी खटके गुलाब कडलग वा गणेश सुरवसे तसेच कृषि पर्यवेक्षक श्री मेघराज वाळुंजकर, आत्मा पुणे रेश्मा शिंदे कृषि सहाय्यक मुक्ता गर्जे, पुष्पा जाधव, ज्योती हिरवे, महेश सुरडकर, नागेश म्हेत्रे, शंकर चव्हाण, महेश महाडिक, अमित साळुंके इ उपस्थित होते. अधिक माहितीसाठी विजय जवळकर मो. न. ९८५०२१४३३० व उत्तम दुंडे ९८५००३८९४३संपर्क साधावा.

Previous articleबी.डी.काळे महाविद्यालयात शिवस्वराज्य दिन उत्साहात साजरा
Next articleचार हजार रुपयांची लाच घेताना तलाठ्याला रंगेहाथ पकडले