चार हजार रुपयांची लाच घेताना तलाठ्याला रंगेहाथ पकडले

राजगुरूनगर- सातबारा वरील नोंद घालण्यासाठी शेतकऱ्याकडुन ४ हजार रुपयांची रक्कम घेताना खेड तालुक्यातील  तलाठी एस एम अमोलिक यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने राजगुरूनगर येथील कार्यालयात मंगळवारी(दि ७) रंगेहात ताब्यात घेतले.खेड तालुक्यातील गेल्या दोन महिन्यातील ही दुसरी घटना आहे.दोन महिन्यांपूर्वी एका तलाठ्याला किरकोळ रक्कम घेताना रंगेहात पकडण्यात आले होते.

वाळद येथील जमीन खरेदी विक्री नंतर होणाऱ्या नोंदी घालण्यासाठी एका स्थानिक शेतकऱ्या कडुन  अमोलिक यांनी काही रक्कम मागितली होती. नोंद घालण्यात आली. मात्र ठरलेल्या पैकी उर्वरित चार हजार रुपये द्यावेत म्हणून  शेतकऱ्याला फोन करून त्रास देत होते. पैसे न दिल्यास घातलेली नोंद रद्द करू अशी धमकी पण देत होते. अखेर शेतकऱ्याने लाचलुचपत विभागाशी संपर्क साधला. प्लॅन झाल्यावर मंगळवारी ही रक्कम देण्यासाठी शेतकरी राजगुरूनगर येथे असलेल्या वाडा तलाठी कार्यालयात आला.येथे त्यांनी शेतकऱ्या कडुन ही रक्कम स्विकारली.

Previous articleशेतकरी ते ग्राहक थेट विक्री केंद्राचे जिल्हा कृषी अधिकारी ज्ञानेश्वर बोटे यांचे हस्ते उद्घाटन संपन्न
Next articleनारायणगावात ३ हजार ५०० किलो गोमांस जप्त