बी.डी.काळे महाविद्यालयात शिवस्वराज्य दिन उत्साहात साजरा

घोडेगाव – येथील आंबेगाव तालुका विद्या विकास मंडळ संचालित बी. डी. काळे महाविद्यालयात सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ आणि विद्यार्थी विकास मंडळाच्या वतीने आणि महाराष्ट्र शासनाच्या आदेशान्वये शिवस्वराज्य दिन नुकताच साजरा करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य प्रोफेसर डॉ. ज्ञानेश्वर वाल्हेकर हे होते.या कार्यक्रमांतर्गत स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य प्रोफेसर डॉ.ज्ञानेश्वर वाल्हेकर यांच्या शुभहस्ते करण्यात आले. यावेळी काव्यवाचन कार्यक्रम घेण्यात आला. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या कार्यकर्तृत्वावर आधारित ‘राजे यावे पुन्हा जन्म घेऊनी’ या स्वलिखित कवितेचे वाचन कार्यालयातील श्री. विनोद काळे यांनी केले.

महाविद्यालयातील इतिहास विभागप्रमुख प्रा.डॉ. नाथा रामभाऊ मोकाटे यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवन चरित्राचा आढावा घेत शिवस्वराज्य दिनाचे महत्त्व विद्यार्थ्यांना त्यांनी पटवून दिले. या कार्यक्रमासाठी महाविद्यालयातील सर्व शिक्षक, शिक्षकेतर सेवक तसेच विद्यार्थी उपस्थित होते. या कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक विद्यार्थी विकास अधिकारी प्रोफेसर डॉ. गुलाबराव पारखे यांनी केले तर आभार प्रदर्शन विज्ञान विभागातील सहाय्यक प्रा. अमोल दप्तरे यांनी केले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सहाय्यक विद्यार्थी विकास अधिकारी प्रा.डॉ.चांगुणा कदम यांनी केले. यावेळी महाविद्यालयातील प्रा.रविंद्र वाळे, प्रा.अमोल दप्तरे इ.मान्यवर उपस्थित होते.

Previous articleशिरदाळे-धामणी रस्त्याच्या कामाला सुरुवात
Next articleशेतकरी ते ग्राहक थेट विक्री केंद्राचे जिल्हा कृषी अधिकारी ज्ञानेश्वर बोटे यांचे हस्ते उद्घाटन संपन्न