शिरदाळे-धामणी रस्त्याच्या कामाला सुरुवात

आंबेगाव तालुक्यातील शिरदाळे ते धामणी या रस्त्याचे काम सार्वजनिक बांधकाम विभाग, गृहमंत्री दिलीप वळसे पाटील आणि जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष विवेक वळसे पाटील यांच्या पाठपुराव्याने मंजूर झाले असून या कामाला सुरुवात झाली आहे. या रस्त्यासाठी तब्बल अडीच कोटींचा निधी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या माध्यमातून देण्यात आला आहे.

शिरूर येथून राजगुरूनगर असा जवळचा असणारा हा रस्ता भविष्यात वाहतुकीसाठी सोईस्कर होणार आहे. खूप दिवस या रस्त्याच्या प्रतीक्षेत ग्रामस्थ होते. या रस्त्याच्या कामाला सुरवात करण्यात आल्याने ग्रामस्थांकडून समाधान व्यक्त करण्यात येत आहे.

शिरदाळे ग्रामपंचायतीच्या वतीने या कामाला भेट देण्यात आली. या वेळी रावसाहेब लोंढे, नीलेश थोरात, उपसरपंच मयूर सरडे, उद्योजक गणेश तांबे, माजी सरपंच मनोज तांबे, राहुल भोर आदी उपस्थित होते.

संबंधित विभागाने दर्जेदार काम करावे, जेणेकरून रस्ता जास्त दिवस टिकेल. या रस्त्याचा प्रवाशांसोबत शाळेत ये जा करणाऱ्या विद्यार्थ्यांना देखील लाभ होणार आहे, असे उपसरपंच मयूर सरडे यांनी सांगितले.

Previous articleबाण सुळक्यावरून शिवरायांना राज्याभिषेक दिनी मानवंदना
Next articleबी.डी.काळे महाविद्यालयात शिवस्वराज्य दिन उत्साहात साजरा