टिळेकरवाडी येथे खरीप हंगाम पुर्व शेतकरी चर्चासत्र संपन्न ; कृषि विभागाच्या अंतर्गत स्तुत्य उपक्रम

उरुळी कांचन

टिळेकर वाडी याठिकाणी महाराष्ट्र शासन कृषि विभाग मार्फत जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी ज्ञानेश्वर बोटे, उपविभागीय कृषि अधिकारी पुणे सुनिल खैरनार , व आत्मा पुणे यांच्या मार्गदर्शनाखाली खरीप हंगाम पुर्व शेतकरी चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते.

खरीप हंगाम पुर्व शेतकरी चर्चासत्र व प्रशिक्षण वर्गात सुनील जोगदंड स.प्रा.विभागीय विस्तार केंद्र म.फु. कृ. राहुरी यांनी रोग नियंत्रण बाबत माहिती दिली. दाते सर कृषी विज्ञान केंद्र बारामती यांनी डाळींब कीड व रोग नियंत्रनाबाबत सविस्तर मार्गदर्शन उपस्थित शेतकऱ्यांना केले. मंडळ कृषी अधिकारी हडपसर जि.के.कडलग यांनी जमीनीचे आरोग्य, जमीन सुपिकता, सेंद्रिय कर्ब, जिवाणू संवर्धन, सेंद्रिय खतांचा अवलंब,जिवाणू संवर्धक खतांच्या वापर बाबत सविस्तर मार्गदर्शन केले. तालुका कृषि अधिकारी हवेली मारुती साळे यांनी महाराष्ट्र शासन कृषि विभागाच्या विविध योजनांची माहिती देताना महाडीबीटी पोर्टल वरील सर्व योजनांची लाॅटरी पद्धतीने निवड, कागदपत्रांची तपासणी, पुर्वसंमती, मोका तपासणी व अनुदान वाटप पदधत, कृषि यांत्रिकीकरण योजना अंतर्गत विविध कृषि औजारे, प्रधान मंत्री सुक्ष्म सिंचन योजना, प्रधानमंत्री सुक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजना, केद्र पुरस्कृत पाॅली हाउस, शेडनेट, मल्चींग, कांदा चाळ, मग्रारोहयो अंतर्गत फळबाग लागवड, गांडुळ खत प्रकल्प नाडेप खत प्रकल्प, विहीर पुनर्भरण लाभार्थी निवड, निकष व अनुदान बाबत सविस्तर मार्गदर्शन त्यांनी उपस्थित शेतकऱ्यांना केले.

यशवंत सहकारी साखर कारखान्याचे माजी उपाध्यक्ष राजेंद्र टिळेकर यांनी शेतकऱ्यांनी कृषि विभागाच्या विविध योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन त्यांनी उपस्थित शेतकऱ्यांना केले.

सदर प्रशिक्षण वर्गास पोलीस पाटील विजय टिळेकर, संतोष टिळेकर, बाळासाहेब चौरे, गणेश टिळेकर, रामचंद्र टिळेकर, किसन टिळेकर, संतोष राऊत, कृषी पर्यवेक्षक रामदास डावखर, कृषि सहाय्यक अमित साळुंखे, राजेंद्र भोसेकर, महेश महाडिक, रेश्मा शिंदे व इतर शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Previous articleनारायणगाव पोलिसांनी लागोपाठ झालेल्या दोन खूनांचा आठ दिवसात लावला छडा
Next articleघरगुती गॅस वाढल्यामुळे मानवी जीवन धोक्यात – हरेश ओझा