घरगुती गॅस वाढल्यामुळे मानवी जीवन धोक्यात – हरेश ओझा

कुरकुंभ , सुरेश बागल

दैनंदिन जीवनात लागणाऱ्या वस्तूंची महागाई दिवसेंदिवस वाढत आहे .दररोजच्या जीवनात लागणाऱ्या वस्तू तेल ,डाळ ,साखर , शेंगदाणे वाढत आहे आणि एका महिन्यात पन्नास रुपये व तीन रुपये ५० पैसे असा एकूण ५३ रुपये ५० पैसे गॅस वाढलेला आहे. त्यामुळे मानवाचे जीवन जगणे अवघड झाले आहे.

दररोज एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी वाहतूक करण्यासाठी पेट्रोल डिझेल आणि स्वयंपाकासाठी लागणारा घरगुती गॅस एक हजार रुपयांच्या पुढे वाढलेला आहे त्यामुळे दौंड काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हरेश ओझा यांनी स्वयंपाकासाठी लागणारा गॅस केंद्र सरकारने कमी करावा ,असा केंद्र सरकारच्या विरोधात तीव्र शब्दात टोला लगावला आहे.

काँग्रेसची सत्ता असताना ३५० रुपये गॅस होता आणि आत्ता एक हजार रुपयांच्या पुढे गेलेला आहे हा गॅस कमी करावा . पेट्रोल डिझेल यामुळे आधीच सर्वसामान्य लोकांचे जीवन जगणे अवघड झाले आहे आणि दैनंदिन जीवनात लागणाऱ्या शेंगदाणे, खाद्यतेल आणि डाळी हे मोठ्या प्रमाणात वाढलेले आहे. सरकारने उज्वला योजना सुरू करून एक हजार रुपयांच्या पुढे आज महागाई गॅस वाढलेला आहे. मोलमजुरी काम करणार्‍या नागरिकांनी महिन्याला एक हजार रुपये आणायचे कुठून या सर्व गोष्टींचा विचार करून केंद्र सरकारने हा निर्णय मागे घ्यावा ,असा दौंड तालुका काँग्रेस कमिटी अध्यक्ष हरेश ओझा यांनी केंद्र शासनाच्या विरोधात आणि तीव्र शब्दात टोला लगावला आहे.

Previous articleटिळेकरवाडी येथे खरीप हंगाम पुर्व शेतकरी चर्चासत्र संपन्न ; कृषि विभागाच्या अंतर्गत स्तुत्य उपक्रम
Next articleमधुकर गिलबिले यांचा जामखेड येथे विशेष सन्मान