मा निलेश लंके यांची महाराष्ट्र डायरेक्ट व्हॉलीबॉल असोसीएशनच्या अध्यक्षपदी निवड

कवठे येमाई (प्रतिनिधी – धनंजय साळवे) पुणे येथे महाराष्ट्र डायरेक्ट व्हॉलीबॉल असोसीएशनच्या संदर्भात राज्य सदस्यांची बैठक मा निलेशजी लंके यांचे अध्यक्षतेखाली पार पडली, या प्रसंगी सर्वानी एकमताने असोसिएशनचे राज्याचे अध्यक्ष म्हणून मा निलेश लंके यांच्या नावाची घोषणा केली,,व्हाॅलीबाॅल हा खेळ महाराष्ट्र ,दिल्ली, पंजाब,हरियाना,गुजरात,कर्नाटक ई.राज्यामध्ये खेळला जातो.परंतु म्हणावा असा राजाश्रय या खेळाला मिळाला नाही .सर्व संघटनांनी मिळुन एकत्र काम करुन हा खेळ वाढवविणे गरजेचे आहे.शासनाकडुनही ह्या खेळासाठी निधी उपल्ब्ध करुन दिला पाहीजे. सरकारी नोकरीमध्ये यातील चांगल्या खेळाडुंना सामाऊन घेतले पाहीजे.

शालेय स्तरापासून ते देशपातळीवर या खेळाचा नावलौकीक वाढून ग्रामीण भागातील मुलांना संधी देण्याचा मानस श्री निलेश लंके यांनी व्यक्त केला, या प्रसंगी माजी आय ए एस अधिकारी चंद्रकांत दळवी साहेब हेही या बैठकिला उपस्थित होते, लवकरच पारनेर येथे भव्य व्हाॅलीबाॅल स्पर्धांचे आयोजन करण्यात येणार आहे. आ.निलेश लंके यांच्या निवडीबद्दल पारनेर व्हाॅलीबाॅल संघटनेचे अध्यक्ष रावसाहेब वराळपाटील , सचिव सुधीर वाखारे पाटील शिरुर व्हाॅलीबाॅल संघटनेचे अध्यक्ष बाबाजी गावडे,उपाध्यक्ष सायकर तात्या,सचिव अमोल शिंदे यांंनी अभिनंदन व आनंद व्यक्त केला.

Previous articleकृषी विभागाच्या वतीने शेतकरी चर्चासत्र वडकी येथे संपन्न
Next articleपाटस टोलनाक्यावर गावठी दारूची वाहतूक करणाऱ्याला अटक ; ४ लाख ७१ हजारांचा मुद्देमाल जप्त