कृषी विभागाच्या वतीने शेतकरी चर्चासत्र वडकी येथे संपन्न

उरुळी कांचन

हवेली तालुक्यातील वडकी येथे महाराष्ट्र शासन कृषि विभाग मार्फत जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी ज्ञानेश्वर बोटे , उपविभागीय कृषि अधिकारी सुनिल खैरनार, तालुका कृषि अधिकारी हवेली मारुती साळे यांच्या मार्गदर्शनाखाली मंडळ कृषि अधिकारी हडपसर यांच्या वतीने खरीप हंगाम पुर्व शेतकरी चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते.

खरीप हंगाम पुर्व शेतकरी चर्चासत्र व प्रशिक्षण वर्गात श्रीमती पुष्पा जाधव, कृषि सहाय्यक यांनी बिजप्रक्रिया प्रात्यक्षिक, बियाणे उगवणक्षमता चाचणी प्रात्यक्षिक, बाजरी पिक प्रात्यक्षिक प्रकल्प, मग्रारोहयो फळबाग लागवड, गांडुळ खत प्रकल्प, नाडेप खत प्रकल्प व विहीर पुनर्भरण याबाबत सविस्तर मार्गदर्शन उपस्थित शेतकऱ्यांना केले.

कृषि पर्यवेक्षक हडपसर-१ मेघराज वाळुंजकर यांनी जमीनीचे आरोग्य, जमीन सुपिकता, सेंद्रिय कर्ब, जिवाणू संवर्धन, सेंद्रिय खतांचा अवलंब, पिकांची फेरपालट, जमीनीतील घटक व पिक उत्पादनातील महत्त्व, विषमुक्त अन्नधान्य, फळे व भाजीपाला उत्पादन, किटकनाशकांचा नियंत्रित वापर, लेबलक्लेम निविष्ठांचा वापर, एकात्मिक किड रोग नियंत्रण, सापळा पिके, चिकट सापळे, फेरोमेन सापळे, जैविक निविष्ठांचा वापर, जिवाणू संवर्धक खतांच्या वापर बाबत सविस्तर मार्गदर्शन केले. तसेच मका पिकांवरील लष्करी अळी नियंत्रण व उपाययोजना, हुमणी अळी नियंत्रण व उपाययोजना तसेच हुमणी अळीच्या प्रभावी नियंत्रण साठी प्रकाश सापळ्यांचा अवलंब करणेचे आवाहन उपस्थित शेतकऱ्यांना केले.

मंडळ कृषि अधिकारी गुलाबराव कडलग (हडपसर) यांनी महाराष्ट्र शासन कृषि विभागाच्या विविध योजनांची माहिती देताना महाडीबीटी पोर्टल वरील सर्व योजनांची लाॅटरी पद्धतीने निवड, कागदपत्रांची तपासणी, पुर्वसंमती, मोका तपासणी व अनुदान वाटप पदधत, कृषि यांत्रिकीकरण योजना अंतर्गत विविध कृषि औजारे, प्रधान मंत्री सुक्ष्म सिंचन योजना, प्रधानमंत्री सुक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजना, केद्र पुरस्कृत पाॅली हाउस, शेडनेट, मल्चींग, कांदा चाळ, मग्रारोहयो अंतर्गत फळबाग लागवड, गांडुळ खत प्रकल्प नाडेप खत प्रकल्प, विहीर पुनर्भरण लाभार्थी निवड, निकष व अनुदान बाबत सविस्तर मार्गदर्शन त्यांनी उपस्थित शेतकऱ्यांना केले.

अरुण दादा गायकवाड सरपंच यांनी अध्यक्षीय भाषण करताना कृषि विभागाच्या खरीप हंगाम पुर्व चर्चा सत्र व शेतकरी प्रशिक्षण वर्गात शेतकऱ्यांना माहिती देताना जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी कृषि विभागाच्या विविध योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन त्यांनी उपस्थित शेतकऱ्यांना केले तसेच आपल्या गावात लवकरच कृषि भवन इमारतीचे बांधकाम पूर्ण होणार असून तेथे शेतकऱ्यांसाठी विविध सोयी सुविधा उपलब्ध करुन दिल्या जातील जेणेकरुन कृषि विभागाच्या विविध योजनांचा लाभ सामान्य शेतकरी वर्गापर्यंत गावपातळीवर राबविणे सोईचे होणार आहे असे मत त्यांनी व्यक्त केले.

तसेच क्षेत्रिय भेटीमध्ये शेतकऱ्यांना विहीर पुनर्भरण कामाची आखणी, कामाची पद्धत, अनुदान वाटप व वांगी पिकांवरील शेंडा अळी नियंत्रण व उपाययोजना बाबत मार्गदर्शन करण्यात आले.

सदर प्रशिक्षण वर्गास महेश गायकवाड ग्रामपंचायत सदस्य, सागरभाऊ मोडक ग्रापंचायत सदस्य, मच्छिंद्र गायकवाड ग्रामपंचायत सदस्य, श्रीमती ज्योती हिरवे, श्रीमती मुक्ता गर्जे, कृषि सहाय्यक दिगंबर जाधव, कृषि मित्र अभिजित मोडक व इतर शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Previous articleनारायणगावात लागोपाठ दुसऱ्या दिवशी खून
Next articleमा निलेश लंके यांची महाराष्ट्र डायरेक्ट व्हॉलीबॉल असोसीएशनच्या अध्यक्षपदी निवड