पाटस टोलनाक्यावर गावठी दारूची वाहतूक करणाऱ्याला अटक ; ४ लाख ७१ हजारांचा मुद्देमाल जप्त

योगेश राऊत ,पाटस

पुणे-सोलापूर महामार्गावरील पाटस (ता. दौंड) ग्रामपंचायत ह्द्दीतील टोलनाका परिसरात चारचाकी गाडीतून हातभट्टी दारू वाहतूक करणाऱ्यास यवत पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.अमित धुल्ला गुडदावत ( वय २४ वर्षे रा. शेलारवाडी, गाडामोडी, ता. दौंड) असे अटक करण्यात आलेल्या हातभट्टी दारू वाहतूक करणाऱ्या आरोपीचे नाव आहे. त्याच्याकडून ४ लाख ७१ हजार ३५० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

यवत पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नारायण पवार यांनीदिलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी (ता. १३) सकाळी यवत पोलीस ठाण्याच्या हद्दीत यवत पोलिसांचे पथक गस्त घालीत होते. पोलीस हवालदार गुरुनाथ गायकवाड यांना सोलापूर बाजूकडून पुणे बाजूकडे मारुती स्विफ्ट या वाहनातुन गावठी हातभट्टी तयार करून वाहतूक करत असल्याची माहिती मिळाली होती.

त्यानुसार पाटस येथील सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक सागर चव्हाण ,पोलीस हवालदार संजय देवकते यांच्यसह पाटस टोल नाका येथे नाकाबंदी करण्यात आली मिळालेल्या माहितीनुसार चारचाकी गाडी येताना दिसली पथकाने तात्काळ सापळा रचून सदर वाहन व चालक अमित गुडदावत याच्या गाडीची पाहणी केली असता सदर वाहनांमध्ये ७ गावठी हातभट्टीची तयार दारूचे कँड दिसू आले. त्यानुसार पोलिसांनी गाडीसह ४, लाख ७१हजार, ३५० रुपयांचा मुद्देमालासह आरोपीला अटक करण्यात आली आहे.

सदरची कामगिरी दौंड उपविभागीय पोलिस अधिकारी राहुल धस, पोलिस निरीक्षक नारायण पवार यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक सागर चव्हाण, पोलीस हवालदार संजय देवकते, निलेश कदम, गुरुनाथ गायकवाड, अक्षय यादव, रामदास जगताप, प्रवीण चौधर यांच्या पथकाने केली आहे.

Previous articleमा निलेश लंके यांची महाराष्ट्र डायरेक्ट व्हॉलीबॉल असोसीएशनच्या अध्यक्षपदी निवड
Next articleधर्मवीर संभाजी राजेंना नागफणी कड्यावरून मुजरा