नारायणागावात गोळीबार करून दहशत पसरवणा-या गुन्हेगारांना पकडण्यात पोलीसांना यश ;२४ तासात आरोपीनां केले जेरबंद

नारायणगाव , किरण वाजगे

नारायणगाव एस.टी.स्टॅण्ड शेजारील हाॅटेल कपिल बियर बार मध्ये बेकायदेशीर जमाव जमवुन, दहशत माजवुन व गोळीबार करून पसार झालेल्या आरोपींना पकडण्यात पोलिसांना यश आले असून यातील गोळीबार केलेला मुख्य आरोपी अभिषेक उर्फ पप्या कोळी याला पोलिसांनी वापी(गुजरात) येथून ताब्यात घेतले असल्याची माहिती उपविभागीय पोलिस अधिकारी मंदार जवळे व सहाय्यक पोलीस निरीक्षक पृथ्वीराज ताटे यांनी दिली.

नारायणगाव पोलीस स्टेशन हद्दीत दि १० मे रोजी रात्री ११ वाजण्याच्या सुमारास हॉटेल कपिलबार मध्ये दारू पिण्यासाठी बसलेल्या दोन गटांमध्ये किरकोळ कारणावरून भांडण होऊन वाद विकोपाला जाऊन एका गटाकडून चाकू तर दुसर्‍या गटाकडून पिस्तुल काढून फायरिंग केले गेले होते. त्यानंतर हे आरोपी फरार झाले होते यामध्ये प्रथम तपासात पोलिसांना एक अल्पवयीन व दोन आरोपी मिळून आले होते. सदर घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन गुन्हा घडले ठिकाणी उपविभागीय पोलीस अधिकारी मंदार जवळे यांनी भेट देवुन पुणे ग्रामीणचे पोलीस अधिक्षक अभिनव देशमुख यांचे मार्गदर्शनाखाली स्थानीक गुन्हे शाखा व नारायणगाव पोलीस स्टेशन यांची संयुक्त तपास पथके बनवून या तपास पथकांना तापसकामी रवाना केले. या पथकांने मिळालेल्या माहितीच्या आधारे यातील आरोपी मनीश उर्फ मन्या विकास पाटे (वय २५ रा.डिंबळेमळा नारायणगाव ता.जुन्नर जि.पुणे), आकाश उर्फ बाबु दिलीप कोळी (वय २१ , रा.वारूळवाडी ता.जुन्नर जि.पुणे मुळ रा.चावडीचैक घोडेगाव ता.आंबेगाव जि.पुणे) व ५ विधीसंघर्षित (अल्पवयीन) बालके यांना २४ तासाचे आत नारायणगाव, मुंबई व वापी गुजरात येथुन ताब्यात घेतले इतर आरोपीं चा शोध सुरू असून दाखल गुन्हयाचा पुढील तपास सहा पोलीस निरीक्षक पृथ्वीराज ताटे करीत आहे.

ही यशस्वी कामगीरी पोलीस अधीक्षक डॉ अभिनव देशमुख, अपर पोलीस अधिक्षक मितेश गटटे , उपविभागीय पोलीस अधिकारी मंदार जवळे यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पो.निरिक्षक अशोक शेळके,
सहा पो.नि.पृथ्वीराज ताटे, पो.उपनिरीक्षक विनोद धुर्वे , सनिल धनवे, पो.हवालदार दिपक साबळे, विक्रम तापकिर, पो.नाईक संदिप वारे, पो.शिपाई अक्षय नवले, निलेश सुपेकर, तसेच नारायणगाव पोलीस स्टेशनचे सहाय्यक फौजदार सतिश टाव्हरे, पो.नाईक दिनेश साबळे, धनंजय पालवे, संतोश कोकणे, पो.शिपाई शैलेश वाघमारे, सचिन कोबल, नविन अरगडे, ढेंबरे, लोहोटे यांचे पथकाने केली आहे.

Previous articleशिरूर येथील श्री छत्रपती संभाजी शिक्षण संस्थेचे सीताबाई थिटे कॉलेज ऑफ फार्मसी शिरूर येथे “बौद्धिक संपत्ती अधिकार”(Intellectual Property Rights) यावर 10 मे 2022 रोजी परिसंवादाचे आयोजन
Next articleनारायणगावात हाणामारी मध्ये एकाचा खून