शिरूर येथील श्री छत्रपती संभाजी शिक्षण संस्थेचे सीताबाई थिटे कॉलेज ऑफ फार्मसी शिरूर येथे “बौद्धिक संपत्ती अधिकार”(Intellectual Property Rights) यावर 10 मे 2022 रोजी परिसंवादाचे आयोजन

कवठे येमाई (प्रति. धनंजय साळवे) -भारताच्या 75व्या स्वातंत्र्य वर्धापन दिनाच्या अनुषंगाने ‘आजादी का अमृत महोत्सव ‘ या शिर्षकाखाली केंद्र शासनाच्या वतीने राष्ट्रीय बौद्धिक संपत्ती जागृकता उपक्रम(National Intellectual Property Awareness Mission) राबविण्यात येत आहे. या उपक्रमा अंतर्गत शिरूर येथील श्री छत्रपती संभाजी शिक्षण संस्थेचे सीताबाई थिटे कॉलेज ऑफ फार्मसी पाॅली शिरूर येथे “बौद्धिक संपत्ती अधिकार”(Intellectual Property Rights) यावर 10 मे 2022 रोजी परिसंवाद आयोजित करण्यात आला होता .या कार्यक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये त्यांच्या नवनिर्माण कल्पना नाविन्यपूर्ण किंवा त्यांच्यामध्ये असणाऱ्या वैविध्यपूर्ण संकल्पनांचे संवर्धन करण्याकरिता हा उपक्रम निश्चितच उपयोगी पडणार आहे.

या परिसंवादासाठी श्री मनोज सोमकुवार, असिस्टंट कंट्रोलर ऑफ पेटंट अँड डिझाईन, पेटंट ऑफिस, मुंबई हे प्रमुख पाहुणे म्हणून लाभले होते लाभले होते. त्यांनी डी. फार्मसी च्या सर्व विद्यार्थ्यांना बौद्धिक संपत्ती अधिकाराविषयी मोलाचे मार्गदर्शन केले. त्यांनी बौद्धिक संपदा जसे पेटंट, डिझाइन, कॉपीराइट, ट्रेडमार्क, भौगोलिक संकेत इत्यादी समजावून सांगितले, त्यांनी पेटंट कसे दाखल करावे, त्यासाठी कोणते फॉर्म आवश्यक आहेत, त्यांचे शुल्क देखील समजावून सांगितले. परिसंवाद अतिशय संवादात्मक आणि माहितीपूर्ण होता. या कार्यक्रमासाठी डी फार्मसी चे 120 विद्यार्थी , प्राचार्य डॉ.अमोल शहा सर, प्रा.विशाल कारखिले, प्रा. मानसी गरदरे
प्रा. विजया पडवळ आणि प्रा.शुभांगी खळदकर उपस्थित होते.

Previous articleराज्यस्तरीय बसवरत्न पुरस्काराने प्रतिक गंगणे यांचा सन्मान
Next articleनारायणागावात गोळीबार करून दहशत पसरवणा-या गुन्हेगारांना पकडण्यात पोलीसांना यश ;२४ तासात आरोपीनां केले जेरबंद