मातोश्री सामाजिक प्रतिष्ठानच्या वतीने थंड पाण्याची पाणपोई

अवसरी खुर्द- येथे श्री काळभैरवनाथ यात्रेनिमित्त स्वर्गीय अलका भगवान ढुमणे यांच्या स्मृतीप्रित्यर्थ मातोश्री सामाजिक प्रतिष्ठानच्या वतीने आलेल्या भावीक भक्तांसाठी थंड पाण्याची पाणपोई सुरु करण्यात आल्याची माहिती मातोश्री सामाजिक प्रतिष्ठानचे अध्यक्ष डाॅ. संतोष ढुमणे यांनी दिली.

डाॅ.संतोष ढुमणे यांच्या आई अलका भगवान ढुमणे यांच्या स्मृतीप्रित्यर्थ गेली सहा वर्षे यात्रेकरूंसाठी हा उपक्रम राबविण्यात येत आहे. चालू वर्षी उन्हाची तीव्रता अधिक तसेच मोठ्या संख्येने यात्रेकरू असल्याने थंड पाण्याच्या पाणपोईचा लाभ मोठ्या संख्येने यात्रेकरू घेत आहेत. पाणपोईचे उद्घाटन सुझलाॅन कंपनीचे वरीष्ठ अधिकारी विक्रम अभंग यांच्या शुभहस्ते करण्यात आले.

याप्रसंगी पत्रकार सुदामराव बिडकर, पत्रकार प्रताप हिंगे,आय आर बीचे व्यवस्थापक रवींद्र वायळ,दिपक टेमकर,प्रदीपशेठ टेमकर, उद्योजक नवनाथशेठ अभंग, मल्हारी अभंग, संकेत धानापुणे, बाळासाहेब गायकवाड तसेच दत्त गणेश सेवा मंडळाचे कार्यकर्ते उपस्थित होते.

मातोश्री सामाजिक प्रतिष्ठानच्या वतीने यापुढेही विविध समाजोपयोगी उपक्रम राबविण्यात येणार आहेत असे मातोश्री सामाजिक प्रतिष्ठानचे अध्यक्ष डाॅ.संतोष ढुमणे यांनी सांगितले.

Previous articleनारायणगावात चोरट्यांचा धुमाकूळ,सीसीटीव्हीत तीन चोरटे कैद
Next articleपत्रकार सुनिल भोसले यांना राज्यस्तरीय आदर्श समाजरत्न प्रेरणा पुरस्कार 2022 प्रदान